Sunday , September 20 2026
Breaking News

शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार

Spread the love

 

कुर्लीत कथालेखन स्पर्धा

निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा प्रयत्न करणे महत्त्वाचे असून यावेळी जाणीव होते. इतरांच्या गुणवत्तेचा आदर करणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे हे गुण विकसित होतात. त्यामुळे शालेय जीवनातील स्पर्धा विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत बनवत नाहीत, तर सकारात्मक विचार करणारे, आत्मविश्वासी आणि आव्हानांना सामोरे जाणारे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे माध्यम असल्याचे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक दशरथ कुंभार यांनी व्यक्त केले.

एच जे सी चीफ फौंडेशन व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे व्ही. बी. शिंदे यांच्या स्मरणार्थ आयोजित कथालेखन व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नारायण ढगे होते.
टी. एम. यादव यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते व्ही. बी. शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. संतोष पाटील यांची शिक्षक संघाचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. नारायण ढगे यांनी स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी माध्यमअसून त्यामुळे आत्मविश्वास वाढतो असे सांगितले. अशोक डोंगरे यांनी स्पर्धेत सहभागी होताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होत असल्याचे सांगितले. एस. ए. पाटील यांनी व्ही. बी. शिंदे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. एस. एस. साळवी यांनी स्पर्धेचे स्वरूप व उद्देश सांगितला. कथालेखन व हस्ताक्षर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत माध्यमिक गटात नंदिनी कुंभार -किसानराव मोरे कॉलेज सरवडे, प्राची मुसळे – मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर, सम्यक कांबळे – सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा आप्पाचीवाडी, तंजिला नायकवडी- मराठा मंडळ हायस्कूल निपाणी, सिद्धी तानाजी शिंदे- सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली यांनी यश संपादन केले.
प्राथमिक गटात जान्हवी वडगुले – मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर देवस्व बुचरे-किसानराव मोरे शाळा -सरवडे, स्वराजली कुंभार – सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा आप्पाचीवाडी, नंदिनी दिवटे – कन्नड उच्च प्राथमिक शाळा- कुर्ली, आराध्या चव्हाण – मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा निपाणी यांनी यश मिळवले. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
यावेळी एस. डी. वडराळे, रामचंद्र कुंभार, कृष्णात मगदूम, बी. एस. हेरवाडे, डी. एस. चौगुले यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. एम. बी. खिरुगडे यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *