Sunday , September 20 2026
Breaking News

मंत्री सतीश जारकीहोळी यांची सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सामान्य कार्यकर्ता अश्वत माळकरी यांच्या घरी सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित केला. यावेळी माळकरी कुटुंबीयांतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान विविध सामाजिक व स्थानिक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न तसेच परिसराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवरही विचारविनिमय करण्यात आला.
मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही सामान्य कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांची विचारपूस करणे, हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मंत्री जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सामान्य कार्यकर्त्याच्या घराला दिलेली ही भेट केवळ औपचारिक भेट न राहता, नेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा भावनिक क्षण ठरला.
यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, ब्राह्मणा तोळी, जीवन मांजरेकर, अझरुद्दीन शेख जी, विशाल म्हेत्रे, तुषार कांबळे, सुशांत कराडे, विठ्ठल मादर, पृथ्वीराज हिरेमनी, अशोक दुर्गमर्गे प्रकाश पाटील, अरुण मालपणी, आल्ताफ शैख, रोहण शेलार, विनय सावंत, ओंकार चव्हाण. यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *