Sunday , September 20 2026
Breaking News

ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे श्रावणी कावळे यांचे आवाहन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटनापासून दूर राहा. ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका, असे मत अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेज मधील विद्यापीठातील संगणक शास्त्र व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षण फोर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी या उपक्रमामध्ये संगणक शास्त्र विभागातील श्रावणी कावळे व पुजा जंगमे या विद्यार्थिनींनी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयावर घेण्यात आलेल्या सेमिनारमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल उदाहरणासह माहिती दिली. ओटीपी कोणाला सांगू नये, अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलची पडताळणी करावी, व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर आलेले संदेश व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. मोबाईल कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी साधनांवर अधिकृत अँटिव्हायरसचा वापर करावा, असे सांगितले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *