Sunday , November 22 2026
Breaking News

परवाना नूतनीकरणाअभावी रक्त संकलन बंद

Spread the love

 

रक्तपिढ्यांचे कामकाज ठप्प ; निपाणी भागातील रुग्णांची गैरसोय

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लब आणि अंकुर या दोन्ही रक्तपेढ्यांचा परवाना नूतनीकरण झालेले नाही. याशिवाय तांत्रिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे या रक्तपेढ्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची सहा महिन्यापासून गैरसोय होत आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तात्काळ रक्त संकलनासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
शहर आणि परिसरातील रुग्णांसाठी असलेल्या रोटरी रक्तपेढी आणि अंकुर रक्तपेढी या दोन्ही बंद असल्याने रुग्णांना आपत्कालीन परिस्थिती, शस्त्रक्रिया आणि प्रसूतीवेळी रक्त मिळणे कठीण झाले आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना चिक्कोडी, बेळगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज येथे धाव घ्यावी लागत आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून जखमींना तातडीने रक्ताची गरज भासते. अशावेळी रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी प्रमाणात होते.
याशिवाय स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदातेही उन्हाळ्यात वाढत्या तामपामानामुळे रक्तदान केलेले नाही. त्याचा फटका रक्तपेढ्यांना बसला आहे. वाढदिवस, जयंती, वर्धापन दिन अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी रोटरी ब्लड बँकेतर्फे युवक मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात होते. पण आता परवाण्याच्या नूतनीकरण अभावी रक्तपिढ्यांचे काम बंद झाले आहे.
—————————————————————-
‘शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने दररोज अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. रुग्णांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अशावेळी रक्त पुरवठा थांबला आहे. तरी संबंधितांनी त्याची दखल घेऊन रक्तदान करण्यास परवानगी द्यावी’.
-दिलीप पठाडे, माजी रोटरी क्लब अध्यक्ष, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मुलांना मैदानावर पाठवून खिलाडूवृत्ती जोपासा

Spread the love        प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी; बोरगावमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *