Sunday , September 20 2026
Breaking News

नंदू मुडशी यांचेकडून हुक्केरी तालुका स्केटिंगपटूंचा सत्कार..

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील GRSA स्केटिंग रींक वर घेण्यात आलेल्या ‘समर व्हेकेशन स्पीड रोलर’ स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या संकेश्वर (शाखा) स्केटरनी घवघवीत यश संपादन केले आहे. विजेत्या स्केटिंगपटूंना संकेश्वर ए.पी.एम.सी. संचालक नंदू मुडशी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी स्केटरना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्केटिंग इनलाईन व क्वाड 1000 मिटर स्पर्धेत गीता मठपती, आरोही शिलेदार, प्रितम निलाज, राही निलाज, तनिष्का आळतेकर, यश अळतेकर प्रथम क्रमांकांचे तर वीर मोकशी, कार्तिक मोकाशी, महंमदरफीक मुल्तानी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
श्लोक मुनोळी यांनी तृतिय क्रमांक पटकाविला आहे.
स्केटरना प्रशिक्षक अजितसिंग शिलेदार, ऋतुजा शिलेदार यांचे बहुमोल मार्गदर्शन पालकांचे सहकार्य लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *