Sunday , September 20 2026
Breaking News

दहावी परीक्षेचा आज निकाल; तृतीय भाषेला यंदा गुण मिळणार

Spread the love

 

बंगळूर : अनेक गोंधळांच्या पार्श्वभूमीवर लाखो विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल उद्या (ता. २३) जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी बुधवारी दिली.

उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा हिंदी विषयाला गुण देण्यात आले आहेत. पुढील वर्षापासून ग्रेड पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी विषयासाठी गुण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असल्याचेही मंत्री म्हणाले.

राज्य सरकारने सुरुवातीला हिंदी विषयासाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत, ग्रेडऐवजी गुण देण्याचे आदेश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *