Monday , September 21 2026
Breaking News

राज्यातील सरकारी शाळांमध्ये ५१ हजार अतिथी शिक्षकांची तात्पुरती भरती

Spread the love

 

बंगळूर : राज्यातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त अध्यापक पदांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ५१ हजार अतिथी शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जारी केला आहे.

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मे महिन्यापासून होत असल्याने, शाळा सुरू होताच शिक्षकांची कमतरता भासू नये यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्राथमिक शाळांसाठी ४० हजार तर माध्यमिक शाळांसाठी ११ हजार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.

ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, कायमस्वरूपी शिक्षकांची भरती होईपर्यंत किंवा चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंतच ती लागू राहणार आहे.

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच अतिथी शिक्षक उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित राहण्यास तसेच शाळांतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यास मदत होणार आहे.

अतिथी शिक्षकांच्या मानधनासाठी आवश्यक निधीचा तपशील तसेच जिल्हा आणि तालुकानिहाय निधी वाटपाचा संपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सरकारने दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *