Friday , November 6 2026
Breaking News

चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने अंगणवाडी सेविका आर्थिक संकटात

Spread the love

 

बेंगळुरू : बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालणाऱ्या अंगणवाड्या या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक मानल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात अंगणवाडीतूनच होत असल्याने त्यांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. मात्र, समाजाच्या या महत्त्वाच्या जबाबदारीचे वहन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यांचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने अनेक सेविकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अंगणवाडी सेविका केवळ बालकांना शिक्षण देण्याचे कार्य करत नाहीत, तर त्यांच्यावर विविध सरकारी योजनांची माहिती संकलित करणे, अहवाल तयार करणे, बीएलओची जबाबदारी पार पाडणे तसेच इतर प्रशासकीय कामांचा मोठा भारही असतो. एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळूनही त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याची भावना सेविकांमध्ये आहे.

चार महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे घरखर्च भागविणे, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईच्या काळात वेतनाविना सेवा बजावणे हे अंगणवाडी सेविकांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित वेतन तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे. बालशिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या सेविकांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *