Tuesday , June 16 2026
Breaking News

म्हैसूरमधील प्रसिद्ध रेस्टो पबला भीषण आग; दोन ठार

Spread the love

 

अभिनेता प्रीतमसह पाच जण गंभीर जखमी

बंगळूर : म्हैसूर शहराच्या बाहेरील आर.टी.नगर परिसरातील दट्टागल्लीजवळ असलेल्या प्रसिद्ध ‘फॉक्स डेन लिकर गॅरेज’ या रेस्टो पबमध्ये सोमवारी झालेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पबचे मालक आणि कन्नड चित्रपट अभिनेते प्रीतम यांच्यासह सात जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘ब्रह्म विष्णु महेश्वर’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेमुळे ओळखले जाणारे प्रीतम यांनी अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील ‘मारा’ आदिवासी संस्कृतीच्या धर्तीवर या रेस्टो पबची उभारणी केली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोमवारी कोणत्याही खाद्यपदार्थावर १७५ रुपयांची विशेष सवलत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पबमध्ये मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने काही क्षणांतच संपूर्ण परिसराला आग लागली. आगीच्या विळख्यात अडकून साहिन (२६, दार्जिलिंग) आणि प्रकाश (२४, नेपाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि त्यांनी आग विझवली. आगीच्या वेळी पबमध्ये २५ हून अधिक लोक उपस्थित होते. आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात आले असून ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सुयोगा आणि अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत अभिनेता प्रीतम, त्यांचा मित्र अविनाश तसेच अन्य काही ग्राहक गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सिलिंडर गळती हे दुर्घटनेचे प्राथमिक कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून दट्टागल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे म्हैसूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेस आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याची रणनीती

Spread the love  क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी पक्षाची खबरदारी बंगळूर : विधानपरिषदेच्या सात जागांसाठी १८ जून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *