रस्ता कामांची पाहणी; नागरिकांच्या समस्या तशाच निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांची मदत संपल्याने या पालिकेचा पदभार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आहे. पण या शहराकडे ते बऱ्याच महिन्यापासून आलेले नव्हते. मात्र बुधवारी (ता.६) सायंकाळी शहर आणि उपनगरांना भेट दिली. यावेळी त्यांनी नगरोत्थान योजनेच्या चौथ्या टप्प्यात मंजूर झालेल्या निधीतून सुरू …
Read More »निपाणी हालसिद्धनाथची निवडणूक होणार बिनविरोध
शेवटच्या दिवशी जोल्ले समर्थकांचे ५ अर्ज; विरोधी गटाकडून एकही अर्ज नाही निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांना मानणाऱ्या ५ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ३९ झाली आहे. पण विरोधी …
Read More »मनपा महापौर तसेच आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडंगुडी यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, रस्त्यांवर लोंबकळणार्या वीजतारांचे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्त अशोक दुडंगुडी ,शहर अभियंता सचिन कांबळे, …
Read More »आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. मनोज शिवाजी पवार हे होते. श्री. पी. ए. पाटील यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर उपाध्यक्ष श्री. संतोष शिवाजी पवार यांनी 2021 ते 2023 सालचा अहवाल व ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवण्यात आला. सर्व सदस्यांनी …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे आचार्य अत्रे विशेष व्याख्यानमाला
बेळगाव : प्रख्यात साहित्यिक, पत्रकार, नाटक कार आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आचार्य अत्रे विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध नाटक कार व दिग्दर्शिका प्रा. संध्या देशपांडे या गुंफणार आहेत. आचार्य अत्रे यांचे मराठी नाट्यस्रुष्टीतील योगदान हा त्यांच्या …
Read More »गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीला परवानगी नाही
मंडल पोलीस निरीक्षक तळवार : गणेशोत्सवाबाबत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव सर्वांना शांततेत साजरा करावयाचा असून सर्व मंडळानी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी वापरण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. इतर किरकोळ आवाजाच्या साधना बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने …
Read More »विश्वकर्मा समाजाला ओबीसी दर्जा द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव : सध्या विश्वकर्मा समाजाला देण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्रात हिंदू मराठा असा उल्लेख केला जातो. त्याऐवजी हिंदू पांचाळ विश्वकर्मा असा उल्लेख करुन समाजाचा समावेश मागासवर्ग २अ मध्ये (ओबीसी) करावा, अशी मागणी विश्वकर्मा सेवा संघातर्फे बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तत्पूर्वी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जात …
Read More »कावेरी पाणी वाद; ‘सर्वोच्च’ने याचिकेची सुनावणी २१ पर्यंत पुढे ढकलली
बंगळूर : कावेरी नदीच्या पाणीवाटप विवादाबाबत तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. कर्नाटक कावेरीतील पाण्याचा पुरेसा निचरा करत नसल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या तामिळनाडू सरकारने कर्नाटकला आणखी पाणी सोडण्याचे निर्देश देणारा अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेणारे …
Read More »निपाणीत शनिवारी ढोल ताशांच्या निनादात लाखाची दहीहंडी
निपाणी (वार्ता) : तब्बल ३७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या चाटे मार्केट व्यापारी दहिहंडी मित्र मंडळच्या वतीने शनिवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता मानाची दहीहंडी फोडली जाणार आहे. विजेत्या गोविंदा पथकास एक लाखांचे बक्षीस व शिल्ड दिली जाणार असल्याचे चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी …
Read More »बंद घराचे कुलूप तोडून २५ तोळे दागिन्यासह ३ लाख लंपास
निपाणीत भर दिवसा चोरी; नागरिकांतून भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील चिमगांवकर गल्लीमधील बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी रफीक अहमदमजीद पट्टेकरी यांच्या घरात तिजोरी फोडून २५ तोळे सोने व ३ लाख रूपयांची रोख रक्कम असा अंदाजे १६ लाख रूपयांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता.५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta