बिरदेव नगरातील घटना; बंद घराला केले लक्ष्य निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बिरोबा माळ भागात सोमवारी (ता.१) भर दुपारी धाडसी चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून चोरी केली आहे. चोरट्यांनी तिजोरी फोडली पण लॉकर न उघडल्याने लॉकरच घेऊनच पलायन केले आहे. या घटनेमध्ये पोलिसांनी …
Read More »माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांना पत्नीशोक
येळ्ळूर : मूळच्या येळ्ळूरच्या व सध्या रा. नाथ पै. सर्कल शहापूर बेळगाव येथील रहिवासी सौ. शांताबाई परशुराम नंदीहळ्ळी (वय 90) वर्षे यांचे वार्धक्याने सोमवार (दि. 1) रोजी सायंकाळी निधन झाले. गुरुवर्य व माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा …
Read More »महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा : खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन
खानापूर : बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येते. अशी देखील कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुवर्णसौध बेळगाव येथे होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाला विरोध म्हणून सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी …
Read More »मार्कंडेय नदीतील मृत जनावरे बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता
बेळगाव : मार्कंडेय नदीपात्रात मृत जनावरे फेकण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येची गांभीर्याने दखल घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने पात्रातील मृत जनावरांना बाहेर काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहरानजीकच्या मार्कंडेय नदीपात्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांत सहा डुक्करं, दोन मेंढ्या …
Read More »हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधच्या तीन किलोमीटर परिसरात जमावबंदी!
बेळगाव : सुवर्ण विधानसौधमध्ये दि. 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौधच्या तीन किलोमीटर परिघामध्ये सोमवार दि. 1 डिसेंबरपासून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश जारी केला आहे. दि. 1 डिसेंबरपासून 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत …
Read More »आनंदवाडी येथे मोफत जंगी कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे प्रकाशन
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यावतीने रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी ३ वाजता बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती मैदानात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या जंगी कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रविवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना वाय पी नाईक यांनी, …
Read More »“चला किल्ले बनवूया” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : सकाळतर्फे दिवाळी निमित्त आयोजित ‘चला किल्ले बनवूया’ या उपक्रमातील बक्षीस वितरण सोहळा कपिलेश्वर मंदिर सभागृहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य प्रायोजक आनंद अकनोजी, अजित जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सकाळचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक उदय होनगेकर यांनी किल्ला परंपरा ही केवळ कलात्मक …
Read More »पीएचडी पदवी न मिळाल्याने विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एचडी पदवी प्रदान न केल्याने एका विद्यार्थिनीने अस्वस्थ मनस्थितीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुजाता बेंडी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून सदर विद्यार्थिनीने 19 गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुजाता हिने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे …
Read More »बोरगावचा संघ ठरला “अध्यक्ष चषका”चा मानकरी
फ्रेंड्स ग्रुपतर्फे आयोजन ; रायबागचा संघ उपविजेता निपाणी (वार्ता) : दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील आणि हिमांशू पाटील यांच्या यांच्या यांच्या स्मरणार्थ फ्रेंड्स क्लब आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बोरगाव क्रिकेट क्लब “अध्यक्ष चषका”चा मानकरी ठरला. या संघाला रोख ५० हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. रायबाग …
Read More »सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणाऱ्या दोघांना अटक
बेळगाव : शहापूर पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर धाड टाकून दोघा जणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्याकडील रोख 2,150 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केल्याची घटना काल शनिवारी घडली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अश्पाक दादाहीर सनदी (वय 39, रा तंबीट गल्ली, होसुर बसवान गल्ली शहापूर बेळगाव) आणि प्रज्वल उर्फ ज्योतिबा शंकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta