Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

धामणे ग्रामस्थांकडून नूतन ग्रा. पं. इमारत बांधण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : धामणे ग्रामपंचायतीची इमारत स्मशानभूमीत न बांधता मोडकळीस आलेली जुनी इमारत काढून त्या ठिकाणीच नवी इमारत बांधण्यात यावी, अशी जोरदार मागणी समस्त धामणे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. धामणे (ता. जि. बेळगाव) येथील ग्रामस्थांच्यावतीने माजी ग्रा. पं. सदस्य विजय बाळेकुंद्री, नितीन पाटील व शिवप्रतिष्ठान धामणे विभाग प्रमुख महेश पाटील …

Read More »

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत साई तायक्वांदोचे सुयश

बेळगाव : सुय कर्नाटक तायक्वांदो संघटनेशी संलग्न असणार्‍या साई तायक्वांदो काकतीच्या तायक्वांदोपटुंनी राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत अभिनंदन यश संपादन केले आहे. दावणगिरी येथे गेल्या 16 व 17 एप्रिल रोजी आयोजित राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत काकती येथील साई तायक्वांदोच्या तायक्वांदोपटुंनी दोन सुवर्ण आणि …

Read More »

जायंट्स सखीचा अधिकारग्रहण कार्यक्रम संपन्न

बेळगाव : आजकाल बारा ते सतरा वयोगटातील मुले ही वेगळ्या वळणावरती जाताना आहेत, त्यांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. जायंट्स सारख्या संस्थांनी यात पुढाकाराने काम करावे, असा सल्ला प्राध्यापिका ॲड. सरिता पाटील यांनी दिला. एसपीएम रोडवरील शिवम हॉलमध्ये संपन्न झालेल्या जायंट्स सखीचा अधिकारग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्या प्रमूख वक्त्या म्हणून बोलत होत्या. …

Read More »

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत लवकरच निर्णय

मुख्यमंत्री बोम्मई, नड्डांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा बंगळूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नवी दिल्लीत कर्नाटकासंदर्भात विशेष बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार किंवा फेरबदलाचा निर्णय घेण्यासाठी मला राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे बोलावले जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले. नड्डा यांनी रविवारी विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट …

Read More »

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद : छत्रपती संभाजीराजे

निपाणीतील शिवपुतळ्यास भेट निपाणी (वार्ता) : निपाणी हे शहर कर्नाटक सीमाभागात असले तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत. त्यामुळे दरवर्षी या परिसरात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली जाते. शेकडो कार्यकर्ते शिवजयंतीसह विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचे हे शिव कार्य कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही मराठी भाषकांच्या आपण सदैव …

Read More »

संकेश्वरात “मटण स्वस्त”ची बनवा-बनवी….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील मांसाहारी लोकांना मटण स्वस्त झाल्याची खुशखबर देणारे मटण विक्रेते शब्दाला जाणणारे दिसेनासे झाले आहेत. मटण पाचशे रुपये झाल्याचा फलक झळकविणारे मटण विक्रेते आता मटणाचा दर 560 रुपये सांगताहेत. मटणात किती मिक्स करुन दिली जाईल, असे सांगून मांसाहारी लोकांची भ्रमनिरास करताना दिसत आहेत. नंबर वन मटणाचा भाव …

Read More »

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट स्केटिंगपटूंचा गौरव

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या स्केटिंगपटू आणि स्केटिंग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गोवावेस येथील स्केटिंग रिंकवर या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपटेकचे बेळगाव विभागाचे पार्टनर विनोद बामणे, सौ. ज्योती बामणे, न्यायाधीश कमलकिशोर जोशी, …

Read More »

बहुजन समाजाने संघर्ष करण्याची गरज!

श्रीकांत होवाळ : बहुजन क्रांती मोर्चातर्फे संमेलन निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सामान्य व्यक्तीलाही व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार दिला आहे. याची आठवण करून देताना सध्याच्या काळात कुणीच काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे सरकार निर्ढावले आहे. असलेल्या व्यवस्थेविरोधात बोलण्याची हिंम्मत ठेवा, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र …

Read More »

ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने दुष्काळी गावांना दिलासा

कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश अथणी : हिप्परगी बॅरेजमधून कागवाड तालुक्यातील ऐनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यात सोमवारी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ऐनापूर जलसिंचन योजनेत पाणी सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. …

Read More »

बाड ग्रामस्थांची तहान भागविणारा अवलिया…..

संकेश्वर (महंमद मोमीन) : बाड ग्रामस्थांची तहान भागविण्याचे कार्य बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके करताहेत. गेली दोन महिने झाली बाड ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ट्रॅक्टर टॅंकरने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम ते करताहेत. त्यामुळे ते बाड ग्रामस्थांची तहान भागविणारे अवलिया बनले आहेत. बाड गावातील सर्वच ग्रामस्थ प्रकाश मैलाके यांच्या घरपोच …

Read More »