Saturday , March 15 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर तीन दिवसाच्या लाॅकडाऊननंतर गजबजले

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर तीन दिवसाच्या कडक लाॅकडाऊननंतर पुन्हा गजबजले. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने सरकाराने राज्यात शुक्रवारी ते रविवारी असे तीन दिवस लाॅकडाऊन पार पडले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून खानापूर शहरात नागरिकांनीएकच गर्दी केली. जो तो कामानिमित्त दुचाकीसह सोबतीला एक व्यक्ती घेऊन बाजारात हजर यामुळे पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला वाव …

Read More »

कोरोना योद्धा सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार

बेळगाव : समर्थ नगर येथील 5 व्या क्रॉसमधील युवक मंडळातर्फे कोरोना योद्धा सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला आहे. सुरेंद्र अनगोळकर यांनी कोरोना काळात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ते फूड फॉर निडीच्या माध्यमातून रुग्णांना जेवण तसेच मोफत रुग्णवाहिका सुविधा पुरवित आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल समर्थ नगर युवक मंडळातर्फे त्यांचा सत्कार …

Read More »

गर्लगुंजीतून रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी ११५१ची देणगी

खानापूर (प्रतिनिधी) : रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी गर्लगुंजी (ता.खानापूर) येथील रहिवासी परशराम सुतार यांची कन्या सौ. मनिषा हिच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधुन रायगड येथे होत असलेल्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी ११५१ची देणगी धनादेशाच्या स्वरूपात श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्थान गर्लगुंजी गावचे धारकरी यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी परशराम सुतार यांचे कुटंब, धारकरी मंडळी उपस्थित होती.

Read More »

रोहिणी बाबुराव पाटील यांची राज्य ज्युडो प्रशिक्षकपदी निवड

बेळगाव : क्रीडा क्षेत्रातील मानाचा एकलव्य पुरस्कार विजेत्या चंदगडच्या सुकन्या सुप्रसिद्ध ज्युडोपटू रोहिणी बाबुराव पाटील यांची बेळगाव जिल्हा युवा सशक्तिकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) राज्य ज्युडो प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.बेळगावशी निकटचा संबंध असणाऱ्या रोहिणी पाटील यांनी ‘ए’ ग्रेड एनआयएस पदविका प्राप्त केली असून त्या हिंदी भाषा घेऊन एमए. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जोल्ले यांचा प्रतिक्रियेस नकार

चिकोडी : ‘हायकमांडने सांगितल्यास राजीनामा देईल’ या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी नकार दिला. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, अफवा काय येत असतात, जात असतात असे जोल्ले यांनी सांगितले. यासंदर्भात सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, महापूर असो वा कोरोनासारखे …

Read More »

… तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ : राजकीय हालचालीना वेग बंगळूर : बी.एस. येडियुराप्पा यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जोपर्यंत भाजप हायकमांडचा विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे सांगून त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे …

Read More »

चंदगड तालुक्यात चार हत्तींचा कळप दाखल; शेतकऱ्यांनी दक्ष रहावे

चंदगड तालुक्यात कर्नाटकातुन दाखल झालेला हत्तींचा कळप तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : महाराष्ट्रामध्ये सतत येणारा वनहत्तीचा कळप चंदगड वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची तयारी शेतकर्‍यांच्याकडून करण्यात येत असतानाच हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.कालच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्याबरोबरच …

Read More »

शास्त्रीनगर भागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शास्त्रीनगर भागात गुजरात भवन येथे गौरी चाफ्याची रोपटी लावण्यात आली. शनिवारी दुपारी भर पावसात रोपटी लावताना एक वेगळाच आनंद मिळत होता. पण सोबतच सकाळी ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण तज्ञ शिवाजी दादांच्या सोबत पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी बोललेले शब्द आठवत होते. अन् त्यांना गावीच राहायला सांगून त्यांच्याशिवाय रोपं …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : जयंत पाटील

सांगली : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळूरु या ठिकाणी बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी …

Read More »

हेल्प फॉर निडीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

बेळगाव : हेल्प फॉर निडी आणि श्रीराम सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर बेळगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी हेल्प फॉर निडीचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर, भारत नागरहोळी, निलेश पटेल, राजू बैलूर आणि अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते.

Read More »