राज्योत्सव मात्र कोविड नियमावलीनुसार साजरा करणार बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमालढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभाग महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटकात घेतला गेल्याच्या निषेधार्थ काळा दिवस म्हणून पाळला जातो. गेल्या सहा दशकात यात कधीही खंड पडला नाही आणि सदनशीर मार्गाने मूकफेरी काढून सीमावासीय मराठी जनता आपला निषेध व्यक्त …
Read More »किरकोळ महागाईत घट; केंद्राला मोठा दिलासा
नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ (सीपीआय इन्फ्लेशन) 4.35 टक्क्यांवर आल्यामुळे देशाला मोठाच दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे ही चलनवाढही आटोक्यात राहिली आहे. मागील महिन्यात ही चलनवाढ 5.30 टक्के एवढी होती. या चलनवाढीचा दर घटल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही …
Read More »मंत्रिपदासाठी आ. रमेश जारकीहोळींची थेट दिल्लीतून फिल्डिंग
बेळगाव : मध्यंतरी काही काळ शांत बसलेल्या गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची कुणकुण लागल्याने त्यांनी आता दिल्ली गाठली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खबर लागल्याने आ. रमेश जारकीहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. याआधी हात दिलेले मंत्रिपद येनकेन प्रकारे …
Read More »आमदारांनी दांडी मारल्यामुळे बुडाची सभा लांबणीवर
बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासंदर्भात महत्वाची चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘बुडा‘च्या बैठकीला भाजप आमदारांच्या अनुपस्थितीचे ग्रहण लागले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाची चौथी बैठक सोमवारी बोलावण्यात आली होती. गेल्या सलग दोन बैठकांना गैरहजर असलेले भाजप आ. अभय पाटील आणि अनिल बेनके या बैठकीलाही अनुपस्थित होते. मात्र …
Read More »निपाणीत पावसाचा हाहाकार!
घराघरात पाणी : घरांच्या भिंतीनाही पाणी निपाणी : आठवडाभर उन्हाचा तडाखा बसून सोमवारी (ता. 11) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शहर आणि परिसरात हाहाकार माजला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील शिवाजीनगर सहाव्या गल्लीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ …
Read More »दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल 55.54 टक्के
बेंगळुरू : अलिकडेच झालेल्या 2021चा दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी निकाल जाहीर केला आहे. एकूण 53 हजार 155 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 55.54 टक्के निकाल लागला. 27 आणि 29 सप्टेंबर रोजी दोन दिवस दहावीची पुरवणी …
Read More »दसर्यानंतर पहिली ते पाचवी शाळा भरविण्याची तयारी!
बेंगळुरू : दसरा संपताच राज्यातील शाळांत पहिली ते पाचवीचे प्राथमिक वर्ग भरविण्याची संपूर्ण तयारी सरकारने पूर्ण केली आहे. माध्यान्ह आहारासह सर्व आवश्यक तयारीपूर्ण केल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बेंगळूर येथे सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कोविड तांत्रिक सल्ला समितीची बैठक …
Read More »बेळगाव-तिरुपती विमान सेवा सुरू
बेळगाव : स्टार एअरलाईन्सच्या तिरुपती -बेळगाव -तिरुपती या आरसीएस उडान -3 योजनेअंतर्गत विमान सेवेला आजपासून समारंभपूर्वक प्रारंभ झाला आहे. तिरुपती हे स्टार एअरकडून बेळगावला जोडले जाणारे सातवे शहर आहे. बेळगाव विमानतळावर आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रमुख पाहुण्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते फित कापण्याससह दीप प्रज्वलन आणि …
Read More »चंदगड येथील फाटकवाडी धरणाला गळती…
फाटकवाडी धरणाच्या परिसरातील जवळपास ४० गावात भीतीचे वातावरण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या फाटकवाडी मध्यम धरण प्रकल्पाला गळती लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या गळतीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. सदरची पाणी गळती तातडीने थाबविणे गरजेचे आहे अन्यथा जवळपास चाळीस गावांना याचा धोका होवू शकतो. …
Read More »अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरी आज सीबीआयने छापेमारी केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचले असून त्यांच्याकडे दोन जणांच्या नावे अटक वॉरंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, देशमुख कुटुंबीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta