Sunday , December 21 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूरात पीडब्ल्यूडी खात्याकडून गाळे काढले, आमदारांची सुचना डावलली

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी वर्गणी काढून 51 गाळे आमदारांच्या सांगण्यावरून उभारण्यात आले होते. मात्र महिन्यातच गाळे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी व त्यांचे सहाय्यक अभियंते सोमवारी जेसीबी घेऊन गाळे काढण्यासाठी आले. यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारक पीडब्ल्यूडी …

Read More »

कॅन्टोन्मेंट बैठक : ऑनलाईन बिलात 5 टक्के सवलत

बेळगाव : शंभर टक्के महसूल वसुलीसाठी ऑनलाईन बिल भरणा करणार्‍या नागरिकांना बिलात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना …

Read More »

मळेकरणी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी

उचगाव : उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना, कोविड-19 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आली. सध्या या परिसरात विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचा वायरस असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने व शासनाने …

Read More »

खानापूर युवा समितीकडून होणार शिक्षकांचा सत्कार

बेळगाव : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर शिवस्मारक येथे उद्या शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ठीक चार वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे, नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील ढेकोळी …

Read More »

ऐकावं ते इपरितच; चंदगड तालुक्यात म्हैसीने दिला वासराला जन्म

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : या जगात काय घडेल हे सांगता येत नाही. काल बाई म्या नवल ऐकीले, पाण्याला मोठी लागली तहान, बकऱ्या पुढे बाई देवच कापिला, या एकनाथ महाराजांच्या भारूडाची आठवण आज चंदगडवासीयाना आली. चक्क म्हैसीने वासरालाच जन्म दिल्याने ऐकावं ते नवलचं ठरलेल्या या घटनेची जोरदार चर्चा चंदगड तालुक्यात …

Read More »

कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू

प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करा : डॉ. संभाजी खराट कोल्हापूर (जिमाका) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज डॉ. संभाजी खराट यांनी स्विकारला, यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. …

Read More »

बेळगाव-खानापूर-रामनगर महामार्गावर लवकरच तिन्ही भाषेत फलक

खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …

Read More »

कोगनोळीत आरोग्य शिबिरात 166 रुग्णांची तपासणी

कोगनोळी : येथील प्रजावणी फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी नारायण बिरू कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावणी फाऊंडेशन व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने धनगर समाज सामुदायिक भवन येथे सर्व आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात, कोगनोळी पंचक्रोशीतील 166 नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करुन घेतली. अरुण पाटील यांनी स्वागत …

Read More »

राष्ट्र आणि धर्माचा आदर राखा : कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजी

बेळगाव : राष्ट्र-धर्म प्रथम हा विचार सदैव लक्षात ठेवा आणि राष्ट्र विचारांनी प्रेरीत मित्रांचे संगठण बनवा, असा विचार सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजींनी मांडला. अंदमानमधील विवेकानंद केंद्रातर्फे चालविल्या जाणार्‍या 1400 विद्यार्थ्यांच्या विद्यालयात दि. 23 सप्टेंबर रोजी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.विजयकुमार, उपप्राचार्या अर्चना गुप्ता, पूर्णवेळ …

Read More »

जिद्द, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते : डॉ. वैभव पाटील

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिद्द, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते, असे विचार आयर्लन्ड येथून पीएचडी मिळवलेला व श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुरचा माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यांनी व्यक्त केले. श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर येथे आयोजित विविध कामांचे पूजन व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात डॉ. वैभव …

Read More »