Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

सिध्दार्थ बोर्डिंगतर्फे डॉक्टर दिन साजरा

बेळगाव : जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्ताने सिध्दार्थ बोर्डिंग शहापूर यांच्यावतीने डॉक्टर रवि मुन्नवळ्ळी यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. डॉ. मुन्नवळ्ळी यांच्या दवाखान्यात आयोजित या सत्कार समारंभात प्रास्ताविक करताना स्वातंत्र सैनिक गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी डॉक्टर हेच आजच्या समाजाचे खरे देव आहेत. तेच या समाजाला तारणारे आहेत. त्यांच्या या कार्याची दखल …

Read More »

बेळगाव : लग्न सोहळ्यावर पहिलीच कारवाई; ठोठावला दंड

बेळगाव : अनलॉक झाल्यावर लग्नसमारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल महापालिकेने पहिलीच कारवाई केली. कणबर्गीतील शांती गार्डनमधील लग्न समारंभावर धडक कारवाई करून 2500 रुपये दंड वसूल केला. लग्न समारंभासाठी 100 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे, पण त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. शिवाय, तिथे सोशल डिस्टन्सचे पालनही करण्यात आले …

Read More »

शिक्षकांची कोविड ड्युटी रद्द करावी

माध्यमिक शाळा नोकर संघटना : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सूर्यवंशी) : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असताना देशात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण सर्वाधिक आढळल्यामुळे सतर्क झालेल्या कर्नाटक सरकारने आंतरराज्य सीमेवर निर्बंध कडक केले आहेत. हे करताना पुन्हा एकदा शिक्षकांना कोविड …

Read More »

बोरगाव कृषी पत्तीन संघाने जपले शेतकर्‍यांचे हित

चेअरमन उत्तम पाटील : संघातर्फे ट्रॅक्टर वितरण निपाणी : बोरगाव प्राथमिक कृषी संघाकडून शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याबरोबरच शेती कर्ज, पाईपलाईन कर्ज, ट्रॅक्टर खरेदी कर्ज यासह गरजवंतांना सवलतीच्या दरात कर्ज वितरण करून शेतकर्‍यांचे हित जोपासण्याचे कार्य करण्यात आल्याचे मत संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …

Read More »

आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्गावर अन्याय

माजी आमदार काकासाहेब पाटील : पत्रकार परिषदेत माहिती निपाणी : राज्य सरकारने जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये तालुका पंचायतीच्या 16 पैकी 8 जागांवर खुल्या प्रवर्गाला संधी दिली आहे. परंतु जिल्हा पंचायतीच्या 6 जागेपैकी केवळ एकाच बेनाडी या मतदारसंघात खुल्या प्रवर्गाला संधी मिळाली आहे. राज्यात भाजपचे …

Read More »

रामनगर-खानापूर महामार्गासाठी रास्ता रोको

आम. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर- रामनगर महामार्गासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पणजी बेळगाव महामार्गावरील गोवाक्राॅसवरील पाटील गार्डन येथे रास्तारोको करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर रामनगर महामार्गाच्या रस्त्याची दैयनिय आवस्था झाली आहे. …

Read More »

नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

बेळगाव : शहापूर आळवण गल्ली येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ज्योती लक्ष्मीकांत यल्लारी (वय 19) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मुचंडी येथील लक्ष्मीकांत यल्लारी (वय 23) याच्याशी बसवाण गल्ली शहापूर येथील ज्योती पोळ हिच्याशी नोंदणी पद्धतीने तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेम …

Read More »

ऑनलाईन फसवणुकीची तक्रार लगेच नोंदवा : डीसीपी डॉ. विक्रम आमटे

बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक झाल्याची प्रकरणे वाढत आहेत. ती रोखण्यासाठी फसवणूक झालेल्यांनी तातडीने सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे. बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले, गेल्या २ वर्षांत बेळगाव पोलिसात ऑनलाईन फसवणुकीची ४७ प्रकरणे दाखल झाली आहेत. …

Read More »

श्रीमहालक्ष्मी कोविड सेंटरच्यावतीने डॉ. नाडगौडा यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्यसाधून खानापूर येथील श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटर व श्रीमहालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील डॉक्टर्स बंधुंचा सत्कार समारोह आयोजिला होता. यानिमित्ताने डॉ. डी. ई. नाडगौडा यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना श्रीमहालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर म्हणाले की, डॉक्टर म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या …

Read More »

खानापूर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन

खानापूर (प्रतिनिधी): कृषी खात्याकडून खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवाहन करण्यात येते की, सन २०२०-२१ सालातील पावसाळी हंगामात कर्नाटक सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत तालुक्यातील चार संपर्क केंद्रातील बिडी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा. गुंजी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा. जांबोटी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा, नाचना. खानापूर संपर्क केंद्रात भात, …

Read More »