Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

द्वितीय पी.यू.सी. वार्षिक परीक्षेसाठी सज्जता : कुमार गंधर्व सभागृहातील मार्गदर्शक आढावा बैठक

  बेळगाव : येथील कुमार गंधर्व सभागृह येथे द्वितीय पी.यू.सी. वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील नव्वदपेक्षा अधिक परीक्षा केंद्रांचे केंद्रप्रमुख, उत्तरपत्रिका प्रमुख, सहप्रमुख, विविध तालुक्यांतील बी.ई.ओ., तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी चिकोडी …

Read More »

गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामदुर्ग येथील रहिवासी उमेश बेडीगेर (३४) असे मृत व्यक्तीचे नाव असून उमेश याला दारूचे व्यसन होते. उमेश हा दारूच्या नशेत असताना क्षुल्लक कारणावरून …

Read More »

१० मार्चला पुन्हा गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार – मुंबईतील सभेतून ठाम इशारा

  मुंबई (अर्जुन विष्णू जाधव) : करीरोड मुंबई येथील मधु दंडवते सभागृहात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने आयोजित केलेली गिरणी कामगार व वारसाची भव्य सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या सभेतून महाराष्ट्र सरकारला कडक शब्दात इशारा देण्यात आला की गिरणी कामगारांच्या घराचा, पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास १० मार्चला …

Read More »

एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू

  रांची : गंभीर आजाराच्या रूग्णांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा (एअर अ‍ॅम्ब्युलन्स) भीषण अपघात झाला. यामध्ये रूग्णासह विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील चतरा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. पोलिस उपायुक्तांनी ७ जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला पीटीआयशी बोलताना दुजोरा दिला. तातडीच्या उपचारासाठी सोमवारी रात्री विमान रांचीमधून दिल्लीकडे रवाना झाले होते. पण …

Read More »

भाजप नेते प्रमोद कोचेरी यांची भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड

  खानापूर : निस्वार्थी भावनेने तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही पद नसताना विशेष प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष आणि खानापूर भाजपमधील ज्येष्ठ नेते कार्यसम्राट प्रमोद कोचेरी यांची भाजप पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी पक्षासाठी दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण केलेल्या …

Read More »

तारांगण व मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन

  बेळगाव : साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या तारांगण व नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने मराठी व कन्नड अशा द्विभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट स्कूल सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष गोव्याच्या चित्रा क्षीरसागर या भूषवणार …

Read More »

कावळेवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण मूहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात संपन्न

  कावळेवाडी…. येथील भजनी मंडळ व ज्ञानेश्वर पारायण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पाच मार्चला तुकाराम बीज दिवशी गावात पारायण उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मूहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर उपस्थित होते. …

Read More »

इंदिरा किटव्दारे लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; बोरगाव संघामध्ये धान्य वितरणाचा प्रारंभ निपाणी (वार्ता)सर्वसामान्य कुटुंबीयांना शुद्ध आणि सात्विक अन्न मिळावे,या उद्देशाने राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबवली आहे. पंचहमी योजनमुळे अनेकांचे जीवन सुखकार झाले आहे. आता लवकरच इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचे वितरण लाभाथ्यर्थ्यांना सरकार करणार असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मण …

Read More »

तंत्रज्ञानाच्या युगात तरुण शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची

  प्रा. डॉ. गजानन राशिंगकर; बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान चर्चासत्र निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग मुठीत आले आहे. पण त्याचा वापर करण्याची आपली जबाबदारीही वाढली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यातून तरुण शास्त्रज्ञांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रायोगिक …

Read More »

कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना होणार : प्रकाश मोरे

  बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष दिवंगत वकील सी. एस. इनामदार यांच्या अकाली निधनानंतर कर्नाटक प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यासंदर्भात माजी निवडणूक प्रभारी प्रकाश मोरे यांच्याशी चर्चा केली असता लवकरात लवकर एक सक्षम प्रदेशाध्यक्ष निवडून पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या …

Read More »