निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य सरकारने पंच हमी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ अनेक सामान्य कुटुंबियांना होत आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी गळतगा येथे पंचमी योजना कमिटी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या योजनेचा सर्वच गरीब कुटुंबांना लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी …
Read More »वस्त्रोद्योग पार्कमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे ; बोरगाव मधील बैठकीत मागणी निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमा भागातील वस्त्रोद्योगाला चालना मिळावी. होतकरू व्यवसायिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राज्य वस्त्रोद्योग खात्यातर्फे बोरगाव येथे ७५ एकरमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून बोगस कागदपत्रे दाखवून सबसिडी लाटली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात …
Read More »येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा अहवाल प्रकाशन व स्मरणिका वितरण
बेळगाव : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 2024 साली 150 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 26 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 रोजी माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा अहवाल प्रकाशन तसेच स्मरणिकेचा वितरण कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला. …
Read More »रणकुंडये गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू जप्त
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (बेळगाव तालुका) रणकुंडये गावच्या हद्दीतील रस्त्यावरुन गोवा राज्यातील दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनावर अबकारी विभागाने धाड टाकून मोठा मद्यसाठा जप्त केला. अबकारी अधिकाऱ्यांनी सीपीआय मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखालील गोवा राज्यातून दारुची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली. सुमारे 3 लाख 12 हजार …
Read More »मक्याच्या शेतात थरारक हत्या; मृतदेहाची विटंबना करून आरोपी फरार
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हिरेनंदीहळ्ळी गावात एकाचा गुप्तांग कापून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी अज्ञाताचा मृतदेह गावाजवळील मक्याच्या शेतात आढळून आला होता. कलमेश कोटी (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी घडलेला हा खून उशिरा …
Read More »श्री रामलिंग देवस्थान रामनगरचा वार्षिक जन्मोत्सव व रथ उत्सव उद्या
बेळगाव : सुपा तालुक्याचे आद्य ग्रामदैवत असलेल्या रामनगर मधील श्री रामलिंग देवस्थान चा वार्षिक जन्मोत्सव सोहळा रविवार दि. 15 ते गुरुवार दि. 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री रामलिंग देवस्थानच्या जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिवशी महापंचामृताभिषेक व …
Read More »सुवर्णयश मिळवलेल्या बेळगावच्या हॉकीपटूंचा लेले मैदानावर गौरव
बेळगाव : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या उदयोन्मुख मुला-मुलींच्या हॉकी संघाचा शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लेले मैदानावर सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तान, मराठा समाज आणि समस्त मराठी भाषिकांच्या वतीने खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण …
Read More »मच्छे येथील संगोळी रायन्ना पुतळ्याचा अवमान नाही : RFSL अहवालातून स्पष्ट
बेळगाव : मच्छे येथील संगोळी रायन्ना पुतळ्यावर आढळलेल्या चिकट पदार्थाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (RFSL) अहवालात संबंधित नमुन्यांमध्ये वनस्पतीजन्य राळ (प्लांट रेजिन) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुतळा, त्याच्या आसपासचा रस्ता तसेच जवळील झाडांच्या पानांवरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळलेला …
Read More »बागलकोट येथील “त्या” घटनेतील दोषींवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करा : श्रीराम सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बागलकोट येथे शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ बेळगावात श्रीराम सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या घटनेतील दोषींवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बागलकोट येथे अत्यंत शांततेत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर काही मुस्लिम समाजकंटकांनी दगडफेक …
Read More »खानापूर तालुक्यातील काही भागात उद्या वीजपुरवठा खंडित
खानापूर : तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे उद्या रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉम विभागातर्फे देण्यात आली आहे. 33 के.व्ही. खानापूर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या रुमेवाडी क्रॉस, दुर्गा नगर, खानापूर स्टेशन रोड, नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्टेशन, मुंडवाड, कुंभारडा, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta