बेळगाव : शनिवार दिनांक 7 व रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी गोवावेस महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन आबा व हिंद स्पोर्ट्स तसेच क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे आयोजन केले आहे. या स्पर्धा मुला -मुलींच्या विविध गटामध्ये घेण्यात येतील व या स्पर्धेला बेळगावसह बेंगलोर, गोवा, कोल्हापूर, …
Read More »मराठा लाईट इन्फन्ट्रीतर्फे मराठा दिवस साजरा
बेळगाव : मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी मराठा दिवस साजरा करण्यात आला. शरकत युद्ध स्मारक येथे मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते येथे युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या योद्ध्यांना शरकत युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. ४ फेब्रुवारी …
Read More »११ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त; मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकांत प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश करत मार्केट पोलिस पथकाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात ११ लाख २५ हजार रुपये किमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, दोन महिला संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरती उर्फ परीदा चौगुले (वय २६), …
Read More »विरोधकांच्या सभात्यागात ‘व्हीबी-जी राम-जी’ कायद्याविरोधात ठराव मंजूर
मनरेगा पुनरुज्जीवनाची मागणी; कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब बंगळूर : केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या व्हीबी-जी राम-जी (ग्रामीण रोजगार व उपजीविका मिशन) कायद्याला तात्काळ रद्द करावे आणि यूपीए काळातील मनरेगा योजना पूर्ववत लागू करावी, या मागणीचा ठराव कर्नाटक विधानसभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या तीव्र …
Read More »अबकारी मंत्री तिम्मापूरांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विधानसभेत गदारोळ
धरणे, घोषणांच्या गोंधळातच ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्यावर चर्चा बंगळूर : अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून बुधवारी विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. भाजपा आणि धजद सदस्यांनी अबकारी विभागातील कथित भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सभागृहात धरणे आंदोलन सुरू ठेवले. या गोंधळामुळे एकदा सभागृह तहकूब करावे …
Read More »मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा उत्साहात प्रारंभ
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘Elites Annual Sports meet 2025-26’ या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ८ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि क्रीडांगणावर दिसणाऱ्या उत्साहाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. …
Read More »निपाणीतील आमराईमधील रेणुका देवीची यात्रेत भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील भाविकासह येथील श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर -सरकार घराण्यातर्फे सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा पार पडली. यात्रा आटोपून आल्यानंतर बुधवारी (ता.४) येथील बौद्ध नगरातील आमराई मधील रेणुका मंदिरात गडकरी यात्रा साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दर्शनासाठी शहरासह उपनगरातील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. श्रीमंत सिद्धोजीराजे …
Read More »ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने यरनाळमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : यरनाळ (ता.निपाणी) येथील ग्रुप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानिमित्त अंमलझरी येथील ग्रामपंचायत सदस्य अभिजित कौंदाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व देऊन सन्मानित केले. अध्यक्षस्थानी येथील माजी नगरसेवक संजय पावले होते. सचिन कौंदाडे यांनी, ग्रामपंचायत सदस्य हे पाच वर्षे कालावधीपुरते असतात. पण कर्मचारी हे …
Read More »कुन्नूरमधील तावदारे वाड्यातील मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त आठवडाभर कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : श्री. क्षेत्र कुन्नूर (ता.निपाणी) येथील तावदारे वाड्यामध्ये मंगळवार (ता.१०) ते सोमवार अखेर महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे. दररोज महाअभिषेक, नामजप आणि जप, दीपोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत. तरीपरिसरातील भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सोहळ्यानिमित्त मंगळवारी (ता.१०) सायंकाळी …
Read More »उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निपाणी फाउंडेशनतर्फे श्रद्धांजली
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक विमान दुर्घटनेत निधन झाल्याच्या धक्कादायक घटनेमुळे सीमाभागासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. निपाणी फाउंडेशन तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली. कॉम्रेड चंद्रकांत खराडे, विठ्ठल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta