Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

प्रति टन केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी हजार रुपये मिळावेत

  राजू पोवार ; कर्नाटकच्या निर्णयानंतर आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये मागणी करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने अनेक ठिकाणी आंदोलने केले. त्याला अनेक मठातील मठाधीश,विविध संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून प्रति टन ३ हजार ३०० रुपये …

Read More »

शिवसृष्टी समोरील रस्ता तब्बल एक वर्षानंतर वाहतुकीसाठी होणार खुला

  बेळगाव : वीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई प्रकरणामुळे वर्षभरापासून चर्चेत असलेला शहापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र ते जुना पीबी रोड शिवसृष्टी समोरील रस्ता तब्बल एक वर्षानंतर वाहतुकीसाठी 40 फूट रुंद खुला करण्याचा मार्ग महानगरपालिकेने घेतला आहे. वाहतुकीचे होणारी कोंडी तसेच नागरिकांच्या मागणीची दखल घेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …

Read More »

बोरगाव हजरत पीर बावाढंगवाली उरुसाला प्रारंभ

  विविध कार्यक्रम, शर्यतींचे आयोजन ; सिकंदर अफराज यांची माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील हजरत हजरत पीर बावाढंगवली आणि हजरत पीर हैदरशा मदरशा उरुससाला गुरुवार (ता.६) प्रारंभ झाला आहे. सोमवार (ता.१०) अखेर विविध धार्मिक कार्यक्रम, शर्यतीसह मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंदु -मुस्लिम उरूस कमिटीचे जेष्ठ व माजी …

Read More »

बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील

  नगरसेवक विलास गाडीवड्डर : केतेश्वर समाजभवनाचा वास्तुशांती समारंभ निपाणी (वार्ता) : बुरुड समाजाच्या मागणीनुसार आठ वर्षांपूर्वी येथील महाबळेश्वरनगर परिसरात समुदायभावनासाठी चार गुंठे जागा नगरपालिकेतर्फे दिली होती. शिवाय दहा लाखाचा निधीही मंजूर केला होता. या समाजभावनाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुढील कामकाजासाठीही निधी मंजूर करणार आहोत. समाज बांधवांनी एकत्रित राहून …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3- 30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे त्यादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दल बैठकीत विचार करण्यात येणार …

Read More »

भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांचे बेळगावचे जिल्हाधिकारी तथा अल्पसंख्यांक विभागाचे नोडल अधिकारी बेळगाव यांना पत्र

  बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने मराठी आणि इंग्रजी फलकांना राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंग फासण्यात आला त्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, त्या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे तसेच भाषिक अल्पसंख्यांकाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासंदर्भात पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडून पाठविण्यात आले आहे. राज्योत्सवाच्या …

Read More »

भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी श्रीमती लीला देसाई यांचे निधन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सीमा चळवळीचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व दिवंगत माजी खासदार भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी लीलाताई दाजीबा देसाई (वय 100) यांचे आज सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. उद्या शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकार नमले; प्रति टन ३,३०० रुपये जाहीर

  सरकार देणार ५० रुपये अनुदान; साखर कारखान्यांना ३२५० रुपये देण्याचे निर्देश बंगळूर : साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३२५० रुपये द्यावेत, तसेच सरकारकडून अतिरिक्त ५० रुपये अनुदान दिले जाईल. यासह उसाचा भाव प्रतिटन ३३०० रुपये होईल, हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू राहील, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या …

Read More »

दगडफेकीत सहा पोलिस जखमी : पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद

  बेळगाव : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, दगडफेकीचा कट रचणाऱ्या गुन्हेगारांना आम्ही अटक करू. हत्तरगी टोलजवळ माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रस्ता मोकळा करताना चुकून लाठीचार्ज झाला. दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू …

Read More »

धामणे गावातील अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त ग्रामस्थांचे रास्तारोको

  बेळगाव : धामणे गावामध्ये अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी धामणे येथे रास्ता रोको करून आंदोलन केले त्यामुळे काही काळ धामणे गावात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर एम. व्ही. बिल्लूर तसेच ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय यांनी आंदोलन स्थळी …

Read More »