Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

प्रतिटन ३५०० रुपये दरासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

  बेळगाव : उसाला प्रतिटन 3,500 रुपये इतका आधारभूत दर मिळेपर्यंत सुरू असलेल्या लढ्याला आपला संपूर्ण पाठिंबा राहील, असे भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी स्पष्ट केले. आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी साखर कारखान्यांवर टीका करताना म्हटले की, ऊस नियंत्रण मंडळासाठी बनवलेले कायदे हे ‘दात …

Read More »

खानापूर तहसीलदारांच्या तात्काळ बदलीचा उच्च न्यायालयाकडून आदेश

  खानापूर : खानापूर तहसीलदार दुंडप्पा कोमार यांना एका आठवड्याच्या आत खानापूर तहसीलदार पदावरून मुक्त करावे आणि त्यांच्या जागी दुसऱ्या तहसीलदारांची नियुक्ती करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. एस. जी. पंडित आणि न्या. गीता के. बी. यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील विभागीय खंडपीठातून महसूल विभागाच्या सचिवांना यासंदर्भात …

Read More »

बस आणि टिप्परची समोरासमोर भीषण धडक; 19 जणांचा मृत्यू

  हैदराबाद : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. चेवेल्ला मंडलमधील खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि टिप्पर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवेल्लाजवळ राज्य परिवहन …

Read More »

गनिमी काव्याने नगरपालिकेवर नवीन ध्वज फडकणारच

  स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण; नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षापासून निपाणी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकत राहिला आहे. तो सीमा भागातील अस्मितेचा प्रतिक आहे. हा ध्वज कोणत्याही राजकीय पक्षाला सीमित नाही. केवळ हिंदू आणि मराठी भाषिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निपाणी नगरपालिकेवर …

Read More »

मिशन ऑलिम्पिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे घवघवीत यश

  बेळगाव : मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना कर्नाटक राज्य आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरपूर पदक घेऊन यश संपादन केले रामनाथ मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या मराठा मंडळ खादरवाडीच्या विद्यालयाचे नाव राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खालील प्रमाणे १) प्रताप परशराम शिवणगेकर – सुवर्ण पदक (48kg) २) माणसी …

Read More »

कापड व्यापाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत अधिकाऱ्यांना निवेदन

  वजन-मोजमाप विभागाकडे प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्याची मागणी बेळगाव : बेळगाव शहर हे कर्नाटकाचे व्यापारी हृदयस्थान म्हणून ओळखले जाते. राज्याच्या सीमेलगत असलेल्या या शहरातील वस्त्रव्यवसायाने नेहमीच आर्थिक क्षेत्रात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र अलीकडच्या काळात वजन आणि मोजमाप कायद्यांतील गुंतागुंतीमुळे व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन …

Read More »

नेहा दिनकर आळतेकर यांनी मिळवला सीए पदवीचा मान

  बेळगाव : दिनकर रामचंद्र आळतेकर (एनकेज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड- एच ओडी अकाऊटंट) व कवयित्री सौ. अस्मिता आळतेकर यांची कन्या नेहा यांनी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) आयोजित अंतिम परीक्षेत यश संपादन करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) हा मानाचा दर्जा प्राप्त केला आहे. त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि ध्येयवेड याचे हे यशस्वी …

Read More »

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेकडून सदलग्यात रास्तारोको

  सदलगा : येथील छ. शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि आणखी एका संघटनेच्याकडून तीन तास रास्तारोको करुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्यांदा घोषणाबाजी केली. रायबागकडून जवाहर साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर आणि आणखीही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे जाणारे उसाचे सुमारे ३५ ते ४० ट्रॅक्टर आणि …

Read More »

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज डी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षाची रूपरेषा समजावून सांगीतली त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. …

Read More »

बेळगाव नगरीत ‘एपीजे अब्दुल कलाम चषक’ कॅरम स्पर्धेचे आयोजन : दिली जाणार 2,85000 रुपयांची पारितोषिके

  बेळगाव : बेळगाव नगरीत दोन दिवशीय एपीजे अब्दुल कलाम ट्रॉफी- सिझन-1 ‘ ऑल इंडिया ओपन कॅरम टूर्नामेंट ‘चे आयोजन करण्यात आले आहे. ही कॅरम स्पर्धा आरटीओ नजीकच्या एलआयसी कार्यालयासमोरच्या डॉ. जे.टी. सीमन्ड्स हॉल ( कित्तूर चन्नम्मा मार्ग ) बेळगाव येथे मंगळवार दि. 4 नोव्हेंबर आणि बुधवार दि. 5 नोव्हेंबर …

Read More »