बंगळूर : दहावी (एसएसएलसी) परीक्षा जवळ येत असताना, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन एसएसएलसी निकालात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने, जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावरून राजभवन–सरकार पुन्हा आमनेसामने
केंद्रावरील टीकेचे भाषण वाचण्यास राज्यपालांचा नकार बंगळूर : राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून, यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाच्या मसुद्यावरून राजभवन आणि सरकार आमनेसामने आले आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्पष्ट शब्दांत राज्य सरकारला कळविले आहे की, २६ जानेवारी रोजी देण्यात येणाऱ्या भाषणात केंद्र सरकारवर …
Read More »जीवनविद्या मिशनच्या वतीने विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन
बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रगती व विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सोमवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, राणी चन्नम्मा सर्कल, …
Read More »किल्ले रायगडला अनेक कार्यकर्ते रवाना
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, मराठी अस्मितेसाठी “लढा नाहीतर गुलामगिरीची सवय होईल” हा नवीन युवकांपर्यंत संदेश घेऊन …
Read More »कानडी पोलिस प्रशासनाची वाकडीच; घेतला “मराठी सन्मान यात्रे”चा धसका!
मागील 70 वर्षांपासून सीमाभागात मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्याबरोबरच मराठी भाषा आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करत असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत असते. सीमाभागात मराठी भाषा संपवण्यासाठी प्रशासनाने जणू कंबरच कसली आहे. असे असताना युवा समिती सीमाभागच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा आणि मराठी …
Read More »बसुर्ते धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक; तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी
बेळगाव : बसुर्ते येथील धरणासाठी शेतकऱ्यांच्या तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनी संपादित करून बसुर्ते येथे धरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र जमिनी संपादित करून वर्ष लोटले तरी देखील अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. सरकारने या भागातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप ग्रामस्थांच्या वतीने अभियंता राजेंद्र …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप तर दोघांना २० वर्षांची सक्तमजुरीची
बेळगाव : बेळगावमधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात बेळगाव विशेष जलदगती जिल्हा पॉक्सो न्यायालयाने शनिवारी चार आरोपींना दोषी ठरवत दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर दोघांना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. १० मे २०२५ रोजी अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून, मैत्री करून, अपहरण करून सावगाव येथील एका फार्महाऊसवर नेण्यात आले, जिथे …
Read More »मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव
बेळगाव : दिनांक 23/01/2026 व 24/01/2026 या दोन दिवशी मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषयाचे शिक्षक सुरेश कुंदेकर तर दुसऱ्या दिवशी क्रीडा शिक्षक श्रीधर बेन्नाळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा …
Read More »कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा जोशपूर्ण सांगता समारंभ उद्या हिंडलगा येथे होणार
मण्णूर : शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे साधन आहे, या उदात्त विचारातून गेले सहा ते सात रविवार सातत्याने राबविण्यात आलेली आणि बेळगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रतिष्ठा मिळवून दिलेली कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमाला उद्या हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा येथे सांगता समारंभाने पूर्णत्वास जाणार आहे. या व्याख्यानमालेत विविध विषयांतील तज्ज्ञ …
Read More »आडीचा प्रतिक मोरे ठरला गावात पहिला नौसैनिक
शिक्षकाच्या मुलाची भारतीय नौसेनेत भरारी निपाणी (वार्ता) : आडी (ता.निपाणी) येथील प्रतिक सिद्धू मोरे याची भारतीय नौसेनेत नुकतीच निवड झाली आहे. भारतीय नौसेनेत भरती होणारा प्रतिक हा आडी गावातील पहिलाच युवक असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकचे प्राथमिक शिक्षण आडी मराठी मुलांची शाळा, सौंदलगा हालसिद्धनाथनगर येथे झाले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta