Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

  मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे आज निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. आज दुपारी ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे …

Read More »

निपाणी परिसरात सोमवारी झाली ओवाळणी; आज अभ्यंगस्नान

  निपाणी (वार्ता) : दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. काही कुटुंबीयांनी सोमवारी ओवाळणीचा कार्यक्रम आटोपला. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी झाली. त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी अनेक कुटुंबीयांनी आपला भाऊरायाला ओवाळणी केली. मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य …

Read More »

निपाणी दर्गाहमध्ये दिवाळीचा पहिला अभिषेक

  दिवाळी सणाचा उत्साह : मानकरी, उरूस कमिटीची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या यांच्या दिवाळी सणाला सोमवारी (ता. २०) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. त्यानुसार उरूस उत्सव कमिटी व मानकरी यांच्या उपस्थितीतधार्मिक विधींना सुरुवात झाली. दर्गाह मधील …

Read More »

डीसीसी बँकेवर जारकीहोळी-जोल्ले गटाचे वर्चस्व

  बेळगाव : अत्यंत चुरशीने झालेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जारकीहोळी-जोल्ले गटाने अखेर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काल रविवारी सात जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये अथणीमधून आमदार लक्ष्मण सवदी, रायबागमधून मावळते अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे आणि रामदुर्गमधून मल्लाप्पा यादवाड यांनी विजय संपादित केला. पण, चर्चेचा विषय बनलेल्या हुक्केरी, निपाणी, …

Read More »

पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे

  आंबा : पशुधनाच्या रक्षणार्थ बिबट्याशी झुंज देताना गोलीवणे येथील वयोवृद्ध दाम्पत्याला जीव गमवावा लागला.आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.वस्तीपासून सहा किलोमीटर वरील शिवारात बकरीच्या पालात वस्ती करून असलेल्या कंक दाम्पत्य बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. निनू यशवंत कंक (वय ७०) व पत्नी रखुबाई (वय ६५ वर्षे) असे मृत दाम्पत्याचे …

Read More »

“देह दान हे श्रेष्ठ दान” या विषयावर डॉ. महान्तेश रामन्नावर यांचे व्याख्यान

  बेळगाव : बेळगाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि प्रगतीशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर विवेकाचा, या मालिकेत डॉ. महान्तेश रामन्नावर यांचे “देह दान हे श्रेष्ठ दान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गिरीश संकुलनाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे हे …

Read More »

साहित्यिक महादेव मोरेंचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन

  लेखिका सुचिता घोरपडे; दिवंगत महादेव मोरेंच्या ‘भरारी’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांनी अस्सल ग्रामीण भागात कथा, प्रवास वर्णन, सर्वसामान्यांची दुःखे शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण साहित्यात मोठी भर पडली आहे. त्याची कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे. त्यामुळे निपाणी शहराचे नाव …

Read More »

देशाच्या प्रगतीत शंकरानंदांचे योगदान महत्वपूर्ण

  सूर्यकांत पाटील- बुदिहाळकर; बी. शंकरानंद यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : सध्या नेते मंडळी खुर्ची टिकवण्याचाच प्रयत्न करत आहेत. अशा आव्हानातून नागरिकांना पुढे जायचे आहे. ‘सत्तेसाठी मी आणि माझ्यासाठी सत्ता’ असे राजकारण सुरू आहे. मात्र बी. शंकरानंद यांनी आपल्या सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज …

Read More »

मिनी अलिंपिक अथलेटिक्स स्पर्धेची निवड चाचणी संपन्न

  बेळगाव : बेळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी जिल्हा अथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही निवड चाचणी जिल्हा स्टेडियम, नेहरू नगर, बेळगाव या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण 100 हून अधिक खेळाडूनी सहभाग घेतला होता त्यात एकूण 10 खेळाडूंना निवडले …

Read More »

मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

  बेळगाव : यावर्षी देशातील अनेक राज्यात महापुरामुळे शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत गरजांपासून माणसे दुरावली गेली. अशा संकटग्रस्त, पूरग्रस्त परिस्थितीतील बांधवांसाठी मदतीचा हात देण्यासाठी दिनांक २ ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने मराठी विद्यानिकेतन जागृती मंचतर्फे पूरग्रस्त मदतनिधीसाठी शाळा ते …

Read More »