Friday , April 17 2026
Breaking News

बोरगाव कृषी पत्तीन संघाने जपले शेतकर्‍यांचे हित

Spread the love

चेअरमन उत्तम पाटील : संघातर्फे ट्रॅक्टर वितरण
निपाणी : बोरगाव प्राथमिक कृषी संघाकडून शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याबरोबरच शेती कर्ज, पाईपलाईन कर्ज, ट्रॅक्टर खरेदी कर्ज यासह गरजवंतांना सवलतीच्या दरात कर्ज वितरण करून शेतकर्‍यांचे हित जोपासण्याचे कार्य करण्यात आल्याचे मत संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे कृषी पत्तीन संघाकडून संघाचे सदस्य धनपाल फिरगन्नावर यांना 6 लाख 80 हजाराचे ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. त्यावेळी उत्तम पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, संघाकडून ट्रॅक्टरसाठी सभासदांना तीन टक्के दराने कर्ज देण्यात येत आहे. आतापर्यंत संघातर्फे सुमारे 25 हून अधिक ट्रॅक्टर वितरण करण्यात आली आहेत. शेतकरी सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी आपण संघाकडून विविध योजना राबवत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या विशेष सहकार्याने जिल्ह्यात सर्वाधिक पत आपल्या संघास मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघाचे मुख्य कार्य निर्वाहक अधिकारी आर. टी. चौगुला यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमास संघाचे संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते, संचालक प्रदीप माळी, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सूमित रोड्ड, राजेंद्र ऐदमाळे, अण्णासो बंकापरे, दर्शन पाटील, राजू गजरे, तैमूर मुजावर, विपुल चौगुले, काकासाहेब बेळंकी, राकेश फिरगन्नवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मलिकजान नदाफ यांनी प्रास्ताविक केले. तर रायगौडा पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *