Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

राहूल गांधी नोव्हेंबरमघ्ये राज्याच्या दौऱ्यावर; नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय औत्सुक्य

  बंगळूर : प्रदेश काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि उत्तराधिकाराच्या चर्चा जोरात सुरू असताना, बिहार निवडणुकीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राज्य दौऱ्यामुळे नोव्हेंबर क्रांतीची पूर्वसंध्या असेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबर क्रांतीपूर्वी राज्य काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. सतीश जारकीहोळी हे सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी आहेत या यतींद्र …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक रविवारी

  खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर काळादिन संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

मतदार अनियमितता प्रकरण : बनावट मतदार हटवण्यासाठी प्रत्येकी ८० रुपयांचा व्यवहार; भाजप नेते गुत्तेदार यांच्या मालमत्तांवर एसआयटीचे छापे

  बंगळूर : बनावट मतदार हटवण्यासाठी एका डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येकी ८० रुपये देण्यात येत होते, असे आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आढळून आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या “मत चोरी”च्या आरोपात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. …

Read More »

श्री विरूपाक्षलिंग समाधीमठ गो-शाळेला ५ टन ऊस अर्पण

  विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षण सेवा समितीकडून संकलन गोरक्षण आणि गोसवर्धन करणे ही काळाची गरज-सुरेश भानसे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष विश्व हिंदू परिषद कडून समाधीमठ गोशाळाला पूजेच्या ५ टन ऊस अर्पण निपाणीतील व्यापाऱ्यांना गोरक्षण सेवा समिती कडून केलेल्या आव्हानाला व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रतिसाद मिळाला. शहरामधील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक दिवाळीनिमित्त …

Read More »

लैला शुगर्सच्या गळीत हंगामास सुरुवात!

  खानापूर : लैला शुगर्सचे 2025-26 सालाचे गळीत हंगाम दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आज बुधवार दि. 22.10.2025 रोजी सुरू करण्यात आला. लैला शुगर्स कारखान्याचे सन 2025-26 सालाच्या गळीत हंगामाला कारखान्याचे चेअरमन व खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर व कारखान्याचे संचालक व रयत बांधव यांच्या हस्ते ऊस केन कॅरिअरमध्ये …

Read More »

तीन पिढ्यांतील सदस्यांनी अनुभवली एकत्रित दिवाळी

  बेनाडीतील तंगडे कुटुंबीयांची दिवाळी ; कुटुंबात आहेत ३२ सदस्य निपाणी (वार्ता) : शहरातील गगनचुंबी इमारतींमध्ये आणि कृत्रिम रोषणाईत हरवलेला सणाचा खरा आनंद अजूनही गावात सापडतो. नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण व इतर कामानिमित्त अनेक जण शहरात वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा गावाकडे येऊन सणाला हजेरी लावून जाणाऱ्या कुटुंबांची संख्या आहे. पण …

Read More »

राज्यातील मागासवर्गीय सर्वेक्षणाची मुदत ३१ पर्यंत वाढविली

  बंगळूर : राज्य मागासवर्गीय स्थायी आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे. हे सर्वेक्षण आता राज्यभर ३१ ऑक्टोबरपर्यंत केले जाईल. घरोघरी सर्वेक्षणात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिक्षक त्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांवर परत येतील. २२ सप्टेंबर रोजी सुरू झालेले हे सर्वेक्षण (जीबीए प्रदेश वगळता) ७ …

Read More »

निपाणी परिसरात सोमवारी झाली ओवाळणी; आज अभ्यंगस्नान

  निपाणी (वार्ता) : दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. काही कुटुंबीयांनी सोमवारी ओवाळणीचा कार्यक्रम आटोपला. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी झाली. त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी अनेक कुटुंबीयांनी आपला भाऊरायाला ओवाळणी केली. मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य …

Read More »

निपाणी दर्गाहमध्ये दिवाळीचा पहिला अभिषेक

  दिवाळी सणाचा उत्साह : मानकरी, उरूस कमिटीची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या यांच्या दिवाळी सणाला सोमवारी (ता. २०) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. त्यानुसार उरूस उत्सव कमिटी व मानकरी यांच्या उपस्थितीतधार्मिक विधींना सुरुवात झाली. दर्गाह मधील …

Read More »

साहित्यिक महादेव मोरेंचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन

  लेखिका सुचिता घोरपडे; दिवंगत महादेव मोरेंच्या ‘भरारी’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांनी अस्सल ग्रामीण भागात कथा, प्रवास वर्णन, सर्वसामान्यांची दुःखे शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण साहित्यात मोठी भर पडली आहे. त्याची कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे. त्यामुळे निपाणी शहराचे नाव …

Read More »