खानापूर : दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ शाहूनगर खानापूर येथील देवीच्या दर्शनास माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या उपस्थित राहून आशीर्वाद घेतले. आज साधारण ११.३० च्या सुमारास अंजलीताई निंबाळकर शाहूनगर येथे देवीच्या नवरात्र उत्सवास पोचल्या. आजचा शेवट दिवस असल्यामुळे ताईंच्या हस्ते आरती झाली. शाहुनगरवाशाीयांनी ताईंचे शाल व हार घालून स्वागत …
Read More »रामनगर-अळणावर मार्गावरील कुंभार्डा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन पादचारी जागीच ठार
खानापूर : आज गुरुवार दि. २ रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास रामनगर-अळणावर मार्गावरील कुंभार्डा (ता. खानापूर) गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन पादचारी जागीच ठार झाले आहेत. सीमा अमर हळणकर (२४) आणि रवळू भरमाणी चौधरी (६५), दोघेही रा. कुंभार्डा, अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कुंभार्डा गावापासून सुमारे एक किलोमीटर …
Read More »पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
बंगळूर : कर्नाटकात नेतृत्वाची चर्चा सुरू असताना, ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. कुनिगलचे आमदार एच. डी. रंगनाथ यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारावा असे म्हटले होते. “मी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री राहीन,” असे …
Read More »विश्व विख्यात म्हैसूर दसऱ्याची आज जंबो सवारीने होणार सांगता
देश – विदेशातील पर्यटकांची गर्दी; मिरवणुकीची जय्यत तयारी बंगळूर : राज्याचा प्रमुख सण असलेल्या दसरा महोत्सवातील सर्वात महत्वाचे आकर्षण असलेल्या जंबोसावरी मिरवणुकीसाठी पॅलेस सिटी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी १ ते १.१८ दरम्यान, शुभ धनुर लग्नादरम्यान राजवाड्याच्या उत्तर (बलराम) दारावर नंदीध्वजाची पूजा करून मिरवणुकीचे उद्घाटन करतील. ते …
Read More »वंटमुरी घाटात झालेल्या अपघातात चापगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकीस्वार नवरात्रीला आपल्या गावी येऊन परत इचलकरंजीला आपल्या कामावर हजर होण्यासाठी जात असताना आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास वंटमुरी घाटात त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, …
Read More »राज्यात पुरामुळे ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान – बैरेगौडा
बंगळूर : काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः उत्तर कर्नाटक प्रदेशात, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. भीमा नदीला आलेल्या पुराचे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. भीमा नदीत दररोज २.८ लाख क्युसेक इतके …
Read More »मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण; तातडीच्या उपाययोजनांचे दिले निर्देश
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी गुलबर्गा, बिदर, यादगिरी आणि विजयपुर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. मंत्री एम. बी. पाटील, कृष्णा बैरेगौडा आणि प्रियांक खर्गे यांच्यासमवेत, मुख्यमंत्र्यांनी गुलबर्ग्यामध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे आणि महाराष्ट्रातील उजनी तसेच नीरा जलाशयांमधून जास्त पाणी सोडल्यामुळे भीमा नदी खोऱ्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. …
Read More »खानापूर उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांचे निधन
खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक आणि मनमिळाऊ अधिकारी उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ३० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे बेळगाव तालुक्यातील कडोली येथील रहिवासी असलेले कल्लाप्पा कोलकार हे गेली आठ ते दहा वर्षे खानापूर तहसीलदार कार्यालयात उप तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात …
Read More »नवरात्रोत्सवानिमित्त निपाणीत विविध मंडळातर्फे गरबा दांडियाचा जल्लोष
निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहरात दांडिया-गरब्याचा जल्लोष रंगात सुरू आहे. तरुणाई उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे. शहरातील प्रमुख मंडळे व क्लबतर्फे आकर्षक मंडप, रोषणाई व सजावट करून दांडिया, गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात गरबा, दांडियाची रंगत वाढत आहे. या विविध समाजातील तरुणाई …
Read More »सततच्या पावसाने झेंडूचा झाला खराटा
फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यातून फुलशेती करणारे शेतकरीही सुटलेले नाहीत. चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेवंती, गुलाब, झेंडूच्या झाडांचा दसऱ्यापूर्वीच खराटा झाला आहे. दसरा, दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा झेंडू अतिवृष्टीने आडवा झाला आहे. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta