Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

मुदतीत फाईली निकाली न निघाल्यास कारवाई मुख्यमंत्र्यांचा इशारा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

  बंगळूर : मुदतीत फायलींचा निपटारा न केल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून रेसकोर्स रोडवरील शासकीय निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फायलींच्या दिरंगाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री कार्यालयातील कृष्णा येथे महत्त्वाच्या विभागांच्या हजारो फायली …

Read More »

खानापूरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

  खानापूर : खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी गावात खानापूर-जांबोटी रस्त्यालगत गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण अमृत पाटील आणि अली हैदर मेराबान शहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांकडून ५ हजाराचा 480 ग्रॅम गांजा, 600 रुपये रोख आणि 2 लाख रु. रुपये किमतीची …

Read More »

निपाणी शहर शिक्षक को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध

  अध्यक्षपदी सुनील शेवाळे : उपाध्यक्षपदी यास्मिन मुल्ला निपाणी (वार्ता) : निपाणी शहर शिक्षक को. ऑप. क्रेडिट सोसायटीची सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणुकीत नूतन संचालक आणि पदाधिकाऱ्याची निवड बिनविरोध निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून हरी नगर शाळेचे शिक्षक सुनील शेवाळे तर उपाध्यक्षपदी यास्मिन मुल्ला यांची निवड करण्यात आली. …

Read More »

पाकाळणी कार्यक्रमाने निपाणी उरुसाची सांगता

चव्हाण वारसासह मानकर -याकडून नैवेद्य :१५ दिवस चालणार कंदुरीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरुसाला रविवारी (ता.६) पासून सुरूवात झाली होती. रविवारी (ता.७) संदल बेडीवाल्यांच्या भर उरूस झाला होता. त्यानंतर चव्हाण वाड्यात चव्हाण वारस व मानकरी ऊरुस कमिटी पदाधिकारी यांच्या …

Read More »

उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिनी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप

मडिवाळ समाजाचा स्तुत्य उपक्रम निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उद्योजक अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या 47 वा वाढदिवस निमित्त येथील मडिवाळ समाजाच्या वतीने समाजाचे प्रमुख पैलवान बाळासाहेब माडिवाळ व मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम राबवून …

Read More »

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अरिहंत’ समूहाचे कायम पाठबळ

  युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निरंतर पणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. युवा …

Read More »

“बेळगाव वार्ता” उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

  बेळगाव : बेळगाव वार्ता आयोजित व किरण जाधव प्रायोजित उत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा- 2022 चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांनी केले. यावेळी बोलताना …

Read More »

मार्ग चोर्लाचा, लाभ कोणाला?

  खानापूर : बेळगाव- चोर्ला राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची मागणी काही हॉटेल व्यावसायिक जांबोटी भागातील नागरिकांना हाताशी धरून करताना दिसत आहेत. राष्ट्रीय महामार्ग झाला तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात तसेच पर्यावरण लवादाकडे देखील धाव घेतली आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी अनमोड मार्ग, हेमाडगा मार्ग …

Read More »

लैला शुगर्सकडून २६०० रू. पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेतकरीवर्गाचा साखर कारखाना म्हणून ओळखणाऱ्या लैला शुगर्सकडुन २४ ऑक्टोबर रोजी गळीत हंगामाला सुरूवात झाली. सुरूवातीला २५०० रूपये पहिला हप्ता जमा करणार असे जाहिर करण्यात आले होते. पण पहिला हप्ता जमा करून १०० रू. प्रतिटन अधिक दर दिला जात आहे. म्हणजे प्रतिटन २६०० रूपये दर …

Read More »

खानापूर कदंबा फाऊंडेशनकडून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या जॅकवेल जवळ बाजूच्या बेटात अडकलेल्या बेवारस मृतदेहावर खानापूर कदंबा फाऊंडेशन संस्थेच्यावतीने अंत्यसंस्कार नुकताच करण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर शहारा जवळून मलप्रभा नदी वाहते. या मलप्रभा नदीच्या पात्राजवळ असलेल्या शहराच्या जॅक वेल जवळ असलेल्या बांबूच्या बेटात एक बेवारस मृतदेह असल्याची …

Read More »