मुंबई : महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. या महामोर्चासाठी जोरदारी तयारी करण्यात आली होती. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन आणि विरोधकांची एकजूट अधोरेखित केली.
या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, नाना पटोले आणि अन्य इतर नेते सहभागी झाले आहेत.
महामोर्चा निघण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमधील सेंट्रल हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी या सभेला संबोधित केले. महामोर्चाला राज्यभरातून कार्यकर्ते आले आहेत. सभास्थळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
भाजपकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसर्या राज्यात जाणे आणि लोकशाहीचे रक्षण आदी मुद्द्यांवर हा मोर्चा काढला जात आहे.
भाजपच्या मंत्र्यांना बौधिक दारिद्य्र : उद्धव ठाकरे
भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांविषयी वादग्रस्त विधान करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद चिघळला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतल घटक पक्षांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणार्या भगतसिंह कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. भाजपमधील नेत्यांना बौधिक दारिद्य्र आलं आहे. या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही म्हटलं.
महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकटवलो आहोत : शरद पवार
संयुक्त मोर्चेवेळी मोठे मोर्चे निघाले. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. सामान्य माणसांच्या मनावर एक नाव अखंड; ’छत्रपती शिवाजी महाराज’. भीक शब्दावरुन पवारांचाही चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल. वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते शरद पवारांच्या निशाण्यावर. महाराजांचा अपमान कदापी सहन करणार नाही, त्यांची हकालपट्टी करा. गलिच्छ शब्द वापरणार्यांना धडा शिकवावा लागेल.
महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी हा मोर्चा : अजित पवार
महाराष्ट्र पेटून उठला तर शांत बसत नाही हे मोर्चाने दाखवलं. महापुरुषांबद्दल गरळ ओकणार्यांचा मास्टर माईंड कोण? चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्ते आलेत. राज्यपालांना हटवलं पाहिजे. जे मंत्री दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. कायद्याचा विसर सरकारला पडलाय. महापुरुषांसाठी वेळ पडल्यास कायदा आणा.