Sunday , September 20 2026
Breaking News

पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याने नगरपालिकेसमोरील नियोजित मोर्चा स्थगित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मुगळे गल्ली, तवटे गल्ली आणि शानेदिवाण गल्ली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी सभापती जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली नागरिकातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. तात्काळ दखल न  घेतल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आयुक्त गणपती पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे नगरपालिकेवर मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती जुबेर बागवान यांनी दिली
तात्काळ दुरुस्ती झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
मुगळे गल्ली. तवटे गल्ली मधील नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. त्याची दखल घेऊन बागवान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. आनंद सोलापूरकर -सरकार यांना त्यांच्या जागेतून पाईपलाईन घालण्याची विनंती केली होती. त्यांनी परवानगी दिल्याने दुरुस्तीसह पाईपलाईन घालण्याचे काम झाले आहे. आता मिळणारे पाणी सुरळीत पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, पाणीपुरवठा विभागाचे इन्चार्ज प्रवीण कनगले, अभियंते पठाण व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *