Sunday , September 20 2026
Breaking News

समाधी मठ येथे शनिवारी गुरु आराधनासह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील समाधी मठातील श्री विरूपाक्षलिंग स्वामीयांच्या जीवंत समाधीस शनिवारी (ता.१२) २१५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्री विरूपाक्षलिंग (संगमदेव) स्वामींच्या १४ वा गुरू आराधना कार्यक्रम आणि श्री विरूपाक्षलिंग महास्वामींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
सोहळ्यात सकाळी ६ वाजताजप योग सकाळी ८ पालखी उत्सव व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजता श्रींचे प्रवचन व महाप्रसाद असे कार्यक्रम ह समाधी मठातील प्राणलिंग स्वामींच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत.
यावेळी कनेरी सिद्धगिरी मठातील जगद्गुरु श्री अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी, विजापूर येथील ज्ञान योगा श्रमातील बसवलिंग स्वामी,
बिळ्ळूर येथीलराजयोगी शगुरुचन्नबसव गुरुबसव स्वामी, माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शंकरारूढ स्वामी- शिरोळ, डॉ. श्रद्धानंद स्वामी-सदलगा,शिवदेव स्वामी- टाकळी, योगनंद स्वामी- चडचण, महेशानंद स्वामी-हंचिनाळ, यतीश्वरानंद स्वामी-कागवाड, अभिनव बसवराजेंद्र स्वामी-बदामी, गिरीशानंद स्वामी- कनकनाळ, भिवानंद स्वामी- बसवनबागेवाडी,शिवशरणानंद स्वामी-चिकालगुंडी, सिद्धप्रसाद स्वामी-चिंचली, बसवमल्लिकार्जुन स्वामी-निपाणी, स्वयंप्रकाश स्वामी- संती, प्रभुलिंग स्वामी- ककमरी हे उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे संयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *