Sunday , September 20 2026
Breaking News

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे नेत्रदीपक देखाव्यांची निर्मिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथे गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित आकर्षक नेत्रदीपक देखावे साकारण्यात आले आहेत. यामध्ये दलाल पेठ येथील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ व ट्रबलर्स ग्रुप यांच्यातर्फे साकारण्यात आलेला ‘काशी घाट दर्शन’ हा देखावा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. निपाणीतच पवित्र काशी घाटाचे दर्शन घडविणाऱ्या या देखाव्यामुळे भाविकामध्ये धार्मिक वातावरणाची अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सोमवारपर्यंत हा देखावा भाविकांसाठी खुला राहणार असून शहर व परिसरातील नागरिकांनी या देखाव्याला भेट देऊन काशी घाटाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. देखाव्याच्या ठिकाणी गंगाजलाशी संबंधित धार्मिक अनुभूती घेण्याची संधीही भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात साकारण्यात आलेला हा काशी घाट देखावा धार्मिक श्रद्धेसोबतच भारतीय संस्कृतीतील गंगा, काशी आणि घाट परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *