Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी परिसरात सोनपावलांनी गौराईचे आगमन

Spread the love

 

दुपारनंतर महिलांची लगबग; भक्तीभावाने केली आरास

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर, ग्रामीण भागात गुरुवारी (ता. १७) गौरीची थाटामाटात विराजमान झाली. माहेरवासिनींचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या या गौरीची दुपारनंतर महिलांनी मुहूर्तावर नदी, विहिरी, तलाव, जलकुंभ आधी ठिकाणी पूजा केली. युवतींनीही साजशृंगार करून सण साजरा केला. पूजेनंतर महिला, युवतींनी झिम्मा, फुगडी, सूप, घागर नाचवून गौरी गीतांनी फेर धरला.
खेडोपाडी परंपरा जपत थेट स्वयंपाक घरात चुलीजवळ या गौराई मातेसाठी आकर्षक आरास मांडली होती. पाटावर शोभिवंत कापड अंथरुण त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश केलेल्या गौराईचे स्वागत झाले. तांब्याच्या गौरीची सर्वसाधारण ज्येष्ठा गौरींची प्रतिष्ठापना घराघरांत केली. काही भागांत माती, शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौराईमाता बसविल्या होत्या. पारंपरिक पद्धतीने फुलांच्या खड्यांच्या गौरी बसविल्या. गौरीच्या आकर्षक, सोज्वळ, छब्या, मुखवटे भाविकांनी भक्तीने घरी आणून पारंपरिक पद्धतीने उपासना केली. शुक्रवारी (ता. १८) कनिष्ठा गौरीचे आगमन होणार आहे त्यानंतर गणपतींसोबत गौरीलाही निरोप दिला जाणार आहे. माहेरी आलेली गौराई संपूर्ण घरात आनंदाने भरल्या मनाने व प्रेमाने वास्तव्य करते. गौरीला नैवेद्यासाठी शेपूच्या भाजीसह सोळा शाकाहारी भाज्या केल्या होत्या.

गौरीच्या पूजेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. अळू, भेंडीसह विविध भाज्यांचा नैवेद्य केला होता.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *