Friday , November 6 2026
Breaking News

बोरगाव अरिहंत उद्योग समूहातर्फे हजरत बाबा ढंगवली दर्ग्यात काँक्रीटीकरणाचा प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील हजरत बाबा ढंगवली दर्गा परिसराच्या विकासाला गती मिळाली असून उद्योगपती अभिनंदन पाटील व सरकाररत्न उत्तम पाटील यांच्या सहकार्याने श्री अरिहंत उद्योग समूहाच्या सहाय्यधनातून काँक्रीटीकरण कामाचा प्रारंभ नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत असून, उरसानिमित्य हजरत बाबा ढंगवली दर्गा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सर्व सुविधांनी युक्त करून आदर्श दर्गा बनविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचा दर्गाह कमिटीतर्फे सत्कर झाला.
बोरगाव शहर हे अठरापगड जाती-धर्मांच्या नागरिकांनी वसलेले असून, शहरातील सर्वधर्मीय नागरिकांची श्रद्धा आणि विश्वास हजरत बाबा ढंगवली दर्ग्यावर आहे. त्यामुळे या दर्गा परिसराचा विकास, सुशोभीकरण आणि आवश्यक सोयी-सुविधांची उभारणी करण्यासाठी पाटील कुटुंबीयांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वीही उद्योगपती अभिनंदन पाटील व बंधू उत्तम पाटील यांनी दर्गा परिसरात विविध विकासकामे आणि काँक्रीटीकरण केले होते. त्याच धर्तीवर श्री अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत उर्वरित काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आल्याचे अभयकुमार मगदूम यांनी सांगितले.
सर्वधर्मीय नागरिकांच्या श्रद्धास्थानाचा विकास व्हावा, परिसर अधिक सुंदर आणि सुविधायुक्त व्हावा, या उद्देशाने हे कार्य सुरू आहे.दरम्यान, दर्ग्याच्या सुशोभीकरणासह आवश्यक सुविधा आणि विविध विकासकामांसाठी उत्तम पाटील यांनी प्रयत्न केल्याने दर्गाह परिसराच्या विकासाला चालना मिळाल्याचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले. फारुक मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सभापती प्रदीप माळी, नगरसेवक तुळशीदास वसवाडे, अमर शिंगे, बाहुबली सोबाणे, बाळासाहेब अपराज, उमर अपराज, तुफान अफराज, नदीम नालाबंद, अशपाक मुजावर, संजय पवार, फारूक मुजावर, शाहरुख मुजावर, हैदर मुजावर, आप्पा मुजावर, सैदुल मुजावर, मज्जिद मुजावर, तैमुर मुजावर यांच्यासह दर्गा कमिटीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *