


निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या (मल्टिस्टेट) इचलकरंजी शाखेचा दुसरा वर्धापनदिन मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. बाबासाहेब हवले या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तर श्री अरिहंत संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी व सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. मुख्य शाखेचे एजीएम शांतिनाथ तेरदाळे यांनी स्वागत केले. इचलकरंजी शाखेतर्फे अध्यक्ष अभिनंदन पाटील, सीईओ श्री. अशोक बंकापुरे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला.
अभिनंदन पाटील म्हणाले, इचलकरंजी शाखेने दोन वर्षांच्या कालावधीत २२ कोटी रुपयांची ठेवी संपादन केल्या आहेत. सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण करत बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीने आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. ग्राहकांचा विश्वास, सभासदांचे सहकार्य, ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास आणि हितचिंतकांचे भक्कम पाठबळ यामुळे संस्थेची प्रगतीची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सहकाररत्न उत्तम पाटील, डॉ. अप्पासाहेब होसकल्ले, डॉ. शोभा होसकल्ले, राहुल म्हेतर, बंडोपंत लाड, किरण पाटील, देवाप्पा जूजारे, रवींद्र नाडगे, मदन होगाडे, सागर कुईक, दिपाली खोत, शशिकला हवले, बाबासाहेब हावले, आर. बी. पाटील, गुंडाप्पा रोजे, खाद्य तेलाचे व्यापारी महेश पाटील, बापूसाहेब तेरदाळे, धनाजी नाईक, सुरेश चेंडक, अभयकुमार खोत, प्रकाश जंगटे यांच्यासह इचलकरंजी परिसरातील नगरसेवक, उद्योजक, विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ठेवीदार आणि शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. शाखाधिकारी शीतल नंदर्गे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील मेलगिरी यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta