


निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फ महर्षी वाल्मिकी व कित्तूर राणी चन्नम्मा जयंती झाली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न डॉ.सी.बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कर्मचारी पूजा इंगळे यांनी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या बद्दल तर कर्मचारी दिलीप गायकवाड यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या विषयी माहिती दिली. सुरज घोडके आणि सन्मती भिकननावर, यांनी एस आय पी व म्युच्युअल फंड गुंतवणूक विषयी कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली, संचालक एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, प्रताप पटणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सुरेश शेट्टी, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के अदन्नावर, महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, महादेव बडगेर चंद्रकांत हणबर यांच्यासह शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निलेश चौगुले यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta