Sunday , July 26 2026
Breaking News

पुरग्रस्तांना डेटबार आहार किटचे वितरण

Spread the love

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेत शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण करण्यात आले आहे. ते डेटबार असल्याची जोरदार चर्चा आज पुरग्रस्त लोकांतून होताना दिसली. आहार किटमधील तूरडाळ, पोहे, रवा, गव्हाचे पीठ डेटबार झाले आहे. तांदूळ, साखर, मिठ, गोडेतेल तेवढे चांगले आहे. आहार किटमधील तूरडाळीची मॅनिफॅक्चरींग डेट 12-8-2021 आहे. सदर डाळ चार महिने वापरता येईल असे पॉकेटवर नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोहे एम. एफजी डेट 3-8-2021 असून एक्सपायरी 7-10-21 आहे. रवा, गव्हाचे पीठ देखील बाद झाले आहे. सदर आहार किट वितरण करण्यापूर्वी संबंधित अधिकार्‍यांनी आहारकिट उघडून पाहिले नाही काय? असा प्रश्न आहार किट घेतलेल्या लोकांतून विचारला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *