Tuesday , June 23 2026
Breaking News

अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणा गांभीर्याने कार्यरत

Spread the love

 

बेंगळुरू : अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणा गांभीर्याने कार्यरत असून संबंधितांवर सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्यातील दीडशे जण पोलिसांच्या रडारवर असून टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
अल्पवयीनांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या विरोधात सायबर क्राईम विभागाने मोहीम उघडली आहे केंद्र सरकारने अशा प्रकारांची गांभीर्याने दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणात राबविली असून जिल्ह्यातील दीडशेहून अधिक जणांवर कारवाई होणार आहे.
सोशल मीडियाचा वाढता वापर आणि याच्यामुळे अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे त्यानुसार सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून अशा प्रकारात गुंतलेल्यांची माहिती त्या त्या राज्याच्या पोलिसांना पाठवली जाते. केंद्रीय यंत्रणांकडून सीआयडी कडे ही माहिती आली आहे त्यानंतर अपलोड करणारी व्यक्ती कोणत्या जिल्ह्याची आहे त्या जिल्ह्यातील सायबर क्राईम विभागाला ही पुढील कारवाईसाठी सदर माहिती पाठविले जाते.
त्यानुसार केंद्रीय यंत्रणांकडून पाठवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारावर स्थानिक पातळीवर एफ आय आर दाखल करण्यात येणार आहे. यामुळे कारवाईच्या कचाट्यात अडकायचे नसेल तर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर येणारे अल्पवयीनांचे असतील व्हिडिओ शेअर करणे नवे व्हिडिओ डाऊनलोड करणे आधी प्रकारांमध्ये गुंतू नये.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मी, गृहज्योती वीज योजनेची घरोघरी पडताळणी

Spread the love  लाभार्थ्यांकडून स्वघोषणापत्र घेणार बंगळूर : गृहलक्ष्मी आणि गृहज्योती (गृहमोफत वीज) योजनांमधील अपात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *