Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा

तांत्रिक सल्लागार समितीची सरकारला शिफारस बंगळूर : कर्नाटक तांत्रिक सल्लागार समितीने मुखवटा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी अनिवार्य मास्क नियम एका आठवड्याच्या आत पुनरुज्जीवित करण्याची शिफारस केली आहे. तसेच मास्क परिधान न करणाऱ्यांविरुध्द दंड आकारण्याचा सल्लाही दिला आहे. बंगळुरमध्ये कोविडची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तथापि, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कोविडचे नियमन …

Read More »

उत्साळी येथे भक्तीमय वातावरणात ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती व कळसारोहण सोहळा सुरूवात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उत्साळी (ता. चंदगड) येथे दि. ६ जून पासून ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे. डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ८ जून रोजी कळस व …

Read More »

निडसोसी श्रींचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटपाने साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस संकेश्वरातील सदभक्तगणांनी सरकारी प्राथमिक मुला-मुलींंच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाने उत्साही वातावरणात साजरा केला. येथील सरकारी प्राथमिक कन्नड-मराठी-उर्दू मुला-मुलींच्या तसेच गौतम शाळेतील विद्यार्थ्यांना सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, राजू बोरगांवी, कुमार बस्तवाडी, संदिप …

Read More »

संकेश्वर पालिकेला उशीरा जाग आली….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील खड्ड्यातून वाटचाल सुरू आहे. गावात २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या चरी (खड्डे) बुजविण्याचे काम तसेच ठेवून देण्यात आल्याने दुचाकी-चारचाकी वाहनधारकांची, ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. संकेश्वरकरांना खड्ड्यातून ये-जा करावे लागत होते. संकेश्वर पालिकेने वेळोवेळी कांहीतरी सबब सांगून …

Read More »

एनइपी अभ्यासक्रमात कौशल विकासावर भर असावा : डॉ. थिम्मेगौडा

पदवी अभ्यासक्रमाबाबत बेंगलोर येथे बैठक बेंगळूर : पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा अभ्यासक्रमातही कौशल विकासावर अधिक भर असावा अशी सूचना कर्नाटक राज्य उच्च शिक्षण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. थिम्मेगौडा यांनी केली. बेंगळूर येथे आयोगाच्या कार्यालयात बुधवारी पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाचा हिंदी अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत तज्ञ समितीची बैठक संपन्न

पुढील बैठक आठ जुलैच्या आधी होणार बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक आज सायंकाळी जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सभासद श्री. राम आपटे, श्री. राजाभाऊ पाटील, श्री. दिनेश ओऊळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ. सुजाता सौनिक, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. …

Read More »

निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा : डॉ. श्रीनिवास पाटील

खानापूर : आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राहत आहोत याची जाणीव ठेवा आणि निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण करा. आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या अभ्यासात रस घ्या, असे आवाहन पर्यावरणप्रेमी वनौषधी तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. खानापूर तालुक्यातील जांबोटी हायस्कूल येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चा अनोखा कार्यक्रम

बेळगाव : 4 जून 2022 हा दिवस मुख्यत्वे मुलांचा संरक्षण दिवस. जोर जबरदस्तीचे बळी म्हणून जागतिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे अध्यक्ष श्री. शिव कुमार हिरेमठ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली अन्य श्री. राहुल पाटील (एनजीओ) व एसडीएमसीचे अध्यक्ष यांनी नुकतीच …

Read More »

‘टीआरएस’ला शह देण्यासाठी भाजपकडून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

नवी दिल्‍ली : तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांनी मागील काही काळापासून भाजपवर सडकून टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपने टीआरएसला शह देण्‍यासाठी नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून 2 आणि 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. राज्‍यात पुढील वर्षी …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात ईडीचा डाव सुरू होणार?

जिल्हा परिषद प्रारुप रचनेचा वाद पोहोचला थेट ईडीच्या दारी! कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारुप निश्चित झाल्यानंतर वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. आता हा वाद थेट ईडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रभाग निश्चित करताना अनेक गावांची तोडफोड ’लक्ष्मी’ दर्शनाने झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा …

Read More »