ऐनापूर येथे कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन उगार खुर्द : फक्त शहरी भागातून नव्हे तर खेड्यातूनही भविष्यात राष्ट्रीयस्तरावरचे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देऊन त्यामध्ये आपले करिअर घडवा, असे आवाहन युवानेते श्रीनिवास पाटील यांनी केले. ऐनापूर येथे नुकत्याच खुल्या कब्बड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. याचे उद्घाटन करून ते बोलत …
Read More »एकत्रित येण्यासाठी महोत्सवांची गरज
आ. श्रीमंत पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : आपल्या परिसरात कुठे ना कुठे पंचकल्याण महोत्सव होत असतो, ही आनंदाची बाब आहे. समाजाने एकत्रित येण्यासाठी असे महोत्सव, समारंभ व कार्यक्रमांची गरज आहे, असे मत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ (ता. कागवाड) येथेल श्री …
Read More »खानापूर युवा समितीचे उद्या विविध विषयांवर तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगारप्रमुखांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमि करणे, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोमवारी तहसीलदाराना निवेदन दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाद्य पदार्थांच्या …
Read More »स्वरूप धनुचे याला राज्यस्तरीय मिनी ओलंपिक जलतरण स्पर्धेत तीन पदके
बेळगाव : नुकताच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या राज्य पातळीवरील मिनी ओलंपिक जलतरण स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात बेळगावच्या स्वरूप सतीश धनुचे याने विविध जलतरण प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली. 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात कास्य पदक मिळविले. तो …
Read More »24 पासून बारावी पेपर तपासणीस प्रारंभ
बेळगाव : पदवीपूर्व द्वितीय वर्षाची म्हणजे बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून आता पेपर तपासणीला सुरुवात होणार असून येत्या मंगळवार दि. 24 मे पासून बेळगाव शहरातील 8 केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. दहावीच्या निकालानंतर आता शिक्षण खात्याने बारावी परीक्षेचा निकाल लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पेपर …
Read More »‘वन टच’चा स्तुत्य उपक्रम; गरजूंना जीवनावश्यक सहित्याचे वाटप
बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील गुडसशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाऊंडेशन (एक हात मदतीचा) संस्थेच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि परिसरातील 20 गरजू कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. वन टच फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विठ्ठल फोंडू …
Read More »गोव्यातील अपघातात बेळगावचे ३ युवक ठार; १ गंभीर जखमी
बेळगाव : गोव्यात प्रवासाला गेलेल्या बेळगावच्या युवकांच्या कारला झालेल्या अपघातात ३ युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना रविवारी सकाळी घडली आहे. गोव्यात फिरायला गेलेल्या युवकांच्या कारला म्हापशाजवळ आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. म्हापशाजवळील कुचेली येथे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक झाली. ही …
Read More »मुंबई विजयी, दिल्ली प्लेऑफच्या बाहेर
मुंबई : पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेटस्नी विजय मिळवून आयपीएल 2022 चा शेवट गोड गेला. या सामन्यात पराभूत झाल्यामुळे दिल्लीचे प्ले ऑफ फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. मुंबईचे आव्हान या आधीच संपुष्टात आले असले तरी त्यांच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्ले …
Read More »प्रभाग १३ ची माळ कोणाच्या गळ्यात…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार याकरिता तर्कवितर्क लढवले जात आहेत. येथे प्रथमच सर्वाधिक ७७% मतदान झाल्यामुळे याचा लाभ कोणाला मिळणार. याविषयी बरीच चर्चा केली जात आहे. तसे पाहिले …
Read More »नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे रेडक्रॉस जिल्हा संघटनेकडून स्वागत
बेळगाव : भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी हे जिल्हा रेडक्रॉस संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जिल्हा संघटनेची माहिती देण्याबरोबरच बीम्समधील संघटनेच्या खोल्या अबाधित ठेवण्याची विनंती केली. भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta