Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

कामांचे श्रेय लाटणार्‍यांवर जरब बसणार; फोटोज लावण्यास निर्बंध

बेळगाव : स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजनांतर्गत हाती घेतलेल्या अनेक कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. यासाठी कामाच्या ठिकाणी आपले छायाचित्र लावत असतात. मात्र, यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत. यापुढे कोणत्याही कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावू नयेत. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. …

Read More »

तालुक्यात मुसळधार पावसाने घरे कोसळलेल्यांना नुकसानभरपाई द्या

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यात गेल्या १५ दिवसात ५१ घरे पडली. संबंधित नुकसानग्रस्ताना तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई वेळीच करावी.यासाठी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थातून होत आहे.तालुक्यातील पडलेली घरे गर्लगुंजी १, हलसी २, मेरडा २, लोंढा ३, …

Read More »

पीडब्लूडी खात्याला गर्लगुंजी रस्त्यावर स्पीडब्रेकच्या मागणीसाठी निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -खानापूर रस्त्याचे डांबरीकरण नुकताच करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने बेफाम वेगाने धावत आहेत. अशाने वारंवार अपघात होत आहे. आतापर्यंत या रस्त्यावर सहा अपघात झाले आहेत. भविष्यात पुन्हा अपघात होऊ नये. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यानी या रस्त्यावरील तोपिनकट्टी क्राॅस, माऊली मंदिर, गणपती मंदिर तसेच …

Read More »

पत्रकार निलीमा लोहार यांचा अवयव, देहदानाचा संकल्प

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘इन न्यूज’च्या ‘आपली मराठी’च्या उपसंपादक आणि युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र बेळगाव जिल्हा शाखेच्या प्रवक्त्या निलीमा लोहार यांनी आपल्या जन्मदिनानिमीत्त अवयव आणि देहदानाचा संकल्प केला आहे. गुरुवारी या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली. कोविड नियमांचे पालन करत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. …

Read More »

सर्वोदय कॉलनीतील बेकायदेशीर घरे जमीनदोस्त

बेळगाव : हिंदवाडी सर्वोदय कॉलनी येथील महापालिकेच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या अकरा घराविरोधात महानगरपालिकेने आज गुरुवारी पोलीस बंदोबस्तत कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान काही कुटुंबांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता कारवाई करण्यात आली. सर्वोदय कॉलनीतील महानगरपालिकेच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली होती. …

Read More »

वटपौर्णिमेचे औचित्यसाधून साहित्य रत्नं परिवारामार्फत वृक्षारोपण

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : साहित्य रत्नं हा वाँट्सअँपच्या माध्यमातून कार्यरत असणारा चंदगड तालुक्यातील साहित्यिकांचा समुह आहे. या समुहाच्या माध्यमातून साहित्य सेवेसोबतचं काही सामाजिक उपक्रम राबवले जातात. म्हणून आज वटपौर्णिमेचे औचित्यसाधून या साहित्यिक समुहामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. कोरोना स्थितीचा अंदाज घेत प्रत्येक साहित्यिकाने व नैसर्गिक हिताचा विचार करणाऱ्या तालुक्यातील …

Read More »

खानापूर तालुक्यात आतापर्यंत 63 हजार जणांचे लसीकरण

खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 63 हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे यांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.खानापूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या दुसरा लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवावा अशी मागणी …

Read More »

लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात

खानापूर युवा समितीच्या पाठपुराव्याला यश बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले जमा करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात चार कोटींची बिले दिली जातील अशी माहिती युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज चौथर्‍याचे काम त्वरित पूर्ण करा; शिवसेनेची मागणी

बेळगाव : बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकासकाम युद्धपातळीवर हाती घेतले जावे अन्यथा येत्या 5 जुलैपासून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा शिवसेनेने दिला आहे. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि शहर प्रमुख दिलीप बैल्लुरकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त इशाऱ्याचे …

Read More »

सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून वटपौर्णिमा सोहळा उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : सात जन्मी हाच पती मिळू दे. असे म्हणत वडाच्या झाडाची पुजा करत खानापूरात वटपौर्णिमा साजरी झाली.यावेळी सुवासिनीनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमे दिवशी वडाची मनोभावे पुजा करतात.आज गुरुवारी दि. २४ रोजी खानापूरातील विद्यानगरात वटपौर्णिमेदिवशी वडाची पुजा करण्यासाठी सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी …

Read More »