Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

कुमारस्वामीविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी द्या; एसआयटीची राज्यपालाना विनंती

  बंगळूर : मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर श्री साई वेंकटेश्वर मिनरल्स कंपनीला ५५० एकर खाण लीज देऊन खाण आणि …

Read More »

मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचे निधन

  बेळगाव : मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक, निपाणीचे सुपुत्र महादेव मोरे यांचे आज पहाटे 21 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाला आहे. सकाळी दहा वाजता त्यांच्या निपाणी माने प्लॉट येथील घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. ग्रामीण मराठी साहित्यिक आणि लेखक महादेव मोरे यांचा जन्म 2 एप्रिल 1938 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव …

Read More »

छत्रपती शिवाजीनगर परिसरात अस्वच्छता; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  बेळगाव : छत्रपती शिवाजीनगर येथील तिसऱ्या गल्लीत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सांडपाणी व‌ गटारी तुंबलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, निमोनिया या सारख्या आजाराना पोषक वातावरण तयार झाले आहे. वॉर्ड नं १३ च्या नगरसेविका …

Read More »

श्री गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी प्रशासनाला गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

  बेळगाव : शहर आणि परिसरातील गणेश भक्तांकडून आता उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाने श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक योग्यरीतीने साजरी करण्यासाठी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रेशन यांना देण्यात आले. अनेक कारणांमुळे श्री विसर्जनाची मिरवणूक लांबते. त्यामुळे विसर्जन सोहळा पूर्ण होण्यासाठी विलंब …

Read More »

सीएससी केंद्रांना राज्य शासनाच्या सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी

  बेळगाव : कर्नाटक शासनाच्या योजना लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सीएससी केंद्रांतून आपलोड करण्याची परवानगी मिळावी. शासनाने केवळ ग्रामीण भागातील ग्रामवन व शहरी भागात कर्नाटक वन यांच्या माध्यमातून गॅरंटी योजना उपलब्ध करून दिले आहे. सेवासिंधू ही सर्विस …

Read More »

तिलारी धरण कालव्याने मार्कंडेय नदीला जोडण्यासंदर्भात खासदार शेट्टर यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या उपयोगाला आणून शेतजमीन बारमाही ओलिताखाली ठेवून हरित क्रांती घडवून आणण्याचा विचार करण्यात यावा यासाठी ‘तिलारी धरण महाराष्ट्र’ कालव्याने नदीला जोडण्यासंबंधीची योजना आखण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सोमवारी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार जगदीश शेट्टर यांना …

Read More »

एल अँड टीच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याने अन्नपूर्णावाडीत दूषित पाण्याचा पुरवठा

  जनतेचे आरोग्य धोक्यात बेळगाव : बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवरील अन्नपूर्णा वाडी येथील रहिवासी भागातील जनतेला सांडपाणीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील जनतेमध्ये संसर्गजन्य आजारांची भीती बळावली आहे. बेळगावात स्मार्टसिटीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र, या विकासादरम्यान होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एल अँड टी कंपनीच्या 24 तास …

Read More »

तोपिनकट्टीचे कल्लाप्पा तिरवीर रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर

  बेळगाव : आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित बेळगाव रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खानापूर तालुक्यातील तोपिकट्टीचे येथील कल्लाप्पा तिरवीर यांनी 46 ते 99 वयोगटात दुसरा क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा बेळगाव जिल्हा क्रीडांगणावार झाली. यामध्ये दहा किलोमीटर, पाच किलो मीटर व तीन किलोमीटर अशा तीन गटांमध्ये 15 ते 30, 31 ते 45 …

Read More »

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी निपाणी नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : महिनाभर झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. आता गणेशोत्सव केवळ पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवापूर्वीच नगरपालिकेने शहर आणि उपनारातील खड्डे मुजवून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन शासन नियुक्त नगरसेवकांनी नगरपालिका आयुक्त दीपक हारदी यांना मंगळवारी (ता.२०) दिले. निवेदनातील …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये 20 ऑगस्ट या शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांतून त्यांना आदरांजली देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शाळेच्या शेती विभागाचे प्रमुख व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अरुण बाळेकुंद्री उपस्थित होते. त्यांच्य हस्ते डॉक्टर दाभोळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन …

Read More »