Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

जीवनविद्या मिशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

  बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन या संस्थेच्या वतीने नववर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रभाकर कोरे हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने शहापूर कोरे गल्ली येथील गंगापुरी महाराज मठ या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. या …

Read More »

प्रेम जाधव याच्याकडून पंजाब केसरी गुरुजीत सिंग घुटना डावावर चीत

  बेळगाव : आनंदवाडीच्या प्रसिद्ध कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत जंगी कुस्ती मैदानात कंग्राळीच्या प्रेम जाधव याने अवघ्या चौथ्या मिनिटात पंजाब केसरी गुरुजीत सिंग याला घुटना डावावर चीत करत आनंदवाडी कुस्ती मैदान मारले. मान्यवरांच्या उपस्थितीत आखाड्यात पहिलं क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. यामध्ये प्रेम जाधव व …

Read More »

युवा समितीच्या वतीने उद्या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन. सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन इतिहास आत्मसात करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यंदा …

Read More »

बसस्थानकात स्वच्छतागृह, पार्किंगसाठी लूट होत असल्याची मानवाधिकार संघटनेची तक्रार

  निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानक आवारात असलेल्या स्वच्छतागृहासह दुचाकी पार्किंगसाठी संबंधित कंत्राटदार प्रवासी व नागरिकांची लूट करत असल्याची तक्रार येथील ४ जे आर मानवाधिकार संघटनेने परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. याशिवाय याबाबतचे निवेदनही आगार प्रमुखांना दिले. निवेदनातील माहिती अशी, शहर व परिसरातील अनेक नोकरदार, कामगार, व्यवसायिक, आणि प्रवासी …

Read More »

कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही

  खासदार प्रियांका जारकीहोळी; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना निपाणी(वार्ता) : शासकीय कामाच्या निमित्ताने अनेक नागरिक कार्यालयात येत असतात. त्यांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिला. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित तालुका …

Read More »

मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ. शिवाजी कागणीकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

  बेळगाव : दि. 30 डिसेंबर रोजी दक्षिण महाराष्ट्र संचलित मराठी विद्यानिकेतनतर्फे ज्येष्ठ पर्यावरणवादी सर्वोदयी कार्यकर्ते डॉ.शिवाजी दादा कागणीकर यांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा व सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व पहिली ते दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे 1 फेब्रुवारी रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज जवळील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) येथे सकाळी साडे दहा वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. यासाठी मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत …

Read More »

सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना साकडे

  बेळगाव : 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सातारा येथे आले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर उच्चाधिकार समितीची बैठक तात्काळ आयोजित करावी, अशी ठाम मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी …

Read More »

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमाबांधवांचे साहित्य संमेलनात आंदोलन

              सातारा : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पहिजे या मागणीसाठी घोषणा देत फलक ध्वज घेऊन, लक्ष वेधत आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करत आंदोलकांना अडवले. उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

ज्येष्ठानी सर्वप्रथम शरीर स्वास्थ्य राखणे महत्वाचे : ज्येष्ठ रंगकर्मीं प्रसाद पंडित

  बेळगाव : ज्येष्ठानी घरात अडगळ ठरू नये यासाठी सर्वप्रथम शरीर स्वास्थ्य राखणे महत्वाचे आहे असा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मीं प्रसाद पंडित यांनी दिला. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या व्हॅक्सिन डेपो येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या उद्यानात आयोजित स्नेह मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने श्री पंडित बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुदृढ शरीर …

Read More »