Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

१४ ऑगस्ट ‘अखंड हिंदूस्थान संकल्प दिना’च्या पार्श्वभूमीवर रविवारी पूर्वतयारी बैठक

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे १४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या ‘अखंड हिंदूस्थान संकल्प दिना’च्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पाटील गल्ली येथील सिद्धेश्वर मंदिर कार्यालयात होणार आहे. या बैठकीत संकल्प दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध …

Read More »

एसआयआर प्रक्रियेवर नागरिक मतदार संरक्षण समितीचा हल्लाबोल

  ‘लाखो मतदारांचा हक्क धोक्यात’; प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी बेळगाव : कर्नाटकातील विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे लाखो मतदारांचा मतदानाचा घटनात्मक हक्क धोक्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिक मतदार संरक्षण समितीने केला आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण प्रक्रियेचा फेरआढावा …

Read More »

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ‘वेदांत’ घेणार जबाबदारी!

  अभियांत्रिकी, एमबीबीएससाठी आर्थिक मदतीचा हात; शिक्षण पूर्ण होईपर्यंत खर्च उचलणार बेळगाव : आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला खीळ बसू नये, यासाठी वेदांत फाउंडेशनने महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मात्र शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय (एमबीबीएस) अभ्यासक्रमातील प्रत्येकी …

Read More »

मुतगा ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मुतगा गावच्या ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला शुक्रवारी पहाटे धार्मिक वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. पारंपरिक पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत यात्रेच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. यात्रेनिमित्त सकाळी गावातील विविध मंदिरांमध्ये देवी-देवतांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री भावेश्वरी देवीच्या मूर्तीची विशेष पूजा करून …

Read More »

सीआयडी तपासानंतर शिवानंद निलण्णावर यांना ईडीचा दणका

  बेळगाव : जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याप्रकरणी आरोप असलेल्या शिवम असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक शिवानंद निलण्णावर यांच्यावर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाड टाकली. बेळगावातील शिवबसव नगर येथील त्यांच्या अपार्टमेंटमधील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या प्रकरणी यापूर्वी बीयूडीएस (BUDS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास …

Read More »

बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता हडपण्याचा डाव; महिला अटकेत

  स्वतःला मूळ मालकीण भासवत उपनोंदणी कार्यालयात ‘रिलीज डीड’; मार्केट पोलिसांची कारवाई बेळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःला मालमत्तेची मूळ मालकीण भासवत उपनोंदणी कार्यालयात हक्कत्यागपत्र (रिलीज डीड) नोंदवून फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. शुभांगी विजय सुळे भावीकर (वय ४०, रा. पिरणवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे …

Read More »

बेळगुंदी, बिजगर्णी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, सरकारी मराठी प्राथमिक शाळा बेळगुंदी आणि बिजगर्णी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या वाढावी आणि मराठी शाळा टिकविण्यासाठी …

Read More »

मारिहाळ पोलिसांची गांजा विक्रीवर धाड; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

  बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची विक्री करणाऱ्या एका युवकावर कारवाई करून त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे १३ हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुच्छंडी गावातील भारत गल्ली येथील रहिवासी प्रकाश अर्जुन बंगारी (वय २१) हा …

Read More »

शहापूर विभाग गणेश उत्सव महामंडळाची बैठक रविवारी

  बेळगाव : मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्या वतीने रविवार दि. 9 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री साईगणेश सोसायटी शहापूर या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली आहे, तरी शहापूर विभागातील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती शहापूर विभाग महामंडळाच्या वतीने नेताजी जाधव, अशोक चिंडक यांनी …

Read More »

बडेकोळ्ळमठ अपघातप्रवण मार्गाच्या कायमस्वरूपी कामाला लवकरच सुरुवात

  बेळगाव : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ येथील अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अंतिम मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पाऊस ओसरताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी …

Read More »