बेळगाव : बंगलोर येथील सतीश हंपीहोळी म्युझिक फाउंडेशन ट्रस्टने ‘ताल यात्रा’ या संगीत-नृत्य संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंडित बसवराज बेंडिगेरी यांच्या स्मृत्यर्थ सुधांशू कुलकर्णी यांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे कर्नाटक कलाश्री मृत्युंजय शेट्टर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “गायन, वादन, …
Read More »सीमाभागातील मराठी शाळांना पुस्तके देण्यास हालचाल; युवा समितीच्या लढ्याला यश
बेळगाव : सीमाभागातील शासकीय मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके वेळेवर न मिळणे आणि अप्रत्यक्षपणे कन्नड भाषेची सक्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या समवेत विविध केंद्रीय आणि राज्य पातळीवर याबाबत तक्रार दाखल केली होती. भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी युवा समितीने …
Read More »‘चला खेळूया मंगळागौर 2026’चा रंगतदार महोत्सव 8 व 9 ऑगस्टला
सखी ग्रुपचा महिलांच्या कला, संस्कृती आणि उद्योजकतेला नवा मंच; विविध स्पर्धा, स्टॉल्स आणि सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी बेळगाव : महिलांमधील पारंपरिक संस्कृती, लोककला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सखी ग्रुप, बेळगाव यांच्या वतीने ‘चला खेळूया मंगळागौर 2026’ या दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 8 ऑगस्ट …
Read More »वडर, कोरवी समाजासाठी स्वतंत्र विकास निगमाची स्थापना करा; राजेंद्र वडर -पवार
निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर विविध समाज घटकांच्या विकासाच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. वडर-कोरवी समाजालाही यापासून अपेक्षा असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विकास निगमाची स्थापना करावी. शिवाय पुरेसा निधी आणि प्रभावी प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे मत वडर समाजाचे राज्य संचालक व माजी जिल्हा पंचायत सदस्य …
Read More »ग्रामपंचायत पातळीवर पंचहमी कमिटीची होणार रचना
रमेश जाधव; योजना कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : पंचहमी गॅरंटी योजनेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. भविष्यात पंचहमी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार प्रयत्नशील असून आता ग्रामपचायत पातळीवर पंचहमी कमिटीची रचना केली जाणार असल्याची माहीती निपाणी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली. तालुका पंचायत …
Read More »बागेवाडी कॉलेजमधील रोट्रॅक्ट क्लबचा उद्या पदग्रहण सोहळा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लब संलग्नित बेळगाव केली संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयातील रोट्रॅक्ट क्लब चा शनिवारी (ता.८) सकाळी दहा वाजता पदग्रहण सोहळा होणार आहे. यावेळी जिल्हा रोटरीचे अध्यक्ष रोटेरियन मिलिंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबच्या बैठकीत अध्यक्ष चेतन लगारे यांनी …
Read More »खानापूरात ‘ओअँसिस जननी यात्रा’ : वंध्यत्वग्रस्त दांपत्यांसाठी सुवर्णसंधी
खानापूर : वंध्यत्वाबाबत जनजागृती निर्माण करणे, आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू दांपत्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी यांच्या वतीने “ओअँसिस जननी यात्रा” या मोबाईल फर्टिलिटी क्लिनिकचे आयोजन दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिवाजी महाराज स्मारक …
Read More »रेशन दुकानदारांवरील कामाचा ताण वाढला; एका महिन्यातच दोन महिन्यांचे धान्य वितरण
ऑगस्ट-सप्टेंबरचे रेशन एकाचवेळी; दोनदा बायोमेट्रिक अनिवार्य, ई-केवायसीमुळे ग्राहकांचीही धावपळ बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या ई-केवायसी मोहिमेचे काम सुरू असतानाच आता रेशन दुकानदारांवर आणखी एका मोठ्या जबाबदारीची भर पडली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य याच महिन्यात एकाचवेळी वितरित करण्यात येणार असल्याने रेशन दुकानदारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या …
Read More »‘घर भाड्याने हवे’च्या बहाण्याने वृद्धेला ८८ हजारांचा गंडा! ओटीपी मिळवत सायबर भामट्यांचा नवा फंडा
बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विळखा घालत असून आता ‘घर भाड्याने घेणार’ या बहाण्यानेही नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडियावर घर भाड्याने देण्याची जाहिरात करणाऱ्या ८१ वर्षीय वृद्धेला विश्वासात घेत सायबर भामट्यांनी ८८ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना हनुमाननगर येथे उघडकीस आली आहे. या …
Read More »लष्करी अधिकाऱ्याचे बंद घर फोडले; ९ लाखांचे दागिने लंपास
प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेल्याची साधली संधी; लष्करी वसाहतीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह बेळगाव : शहरातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी वसाहतीतच चोरट्यांनी धाडसी डाव साधला. प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घराचा कडीकोयंडा फोडून ९ लाख १९ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta