Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठीचे शिलेदार मायमराठीसाठी एकत्र; राज्यभर संयुक्त जनजागृतीची घोषणा

  मुंबई (मीरारोड) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या मीरारोड येथील मध्यवर्ती कार्यालयात राज्याध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा, मराठी अस्मिता, सीमाभागातील मराठी बांधवांचे न्याय्य हक्क तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मराठी एकीकरण समिती, …

Read More »

‘क्रांती सप्ताह’ आचरणातून देशप्रेम जागर: म.मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या उपक्रमाचा दिमाखदार प्रारंभ

  बेळगाव : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. याच राष्ट्रनिष्ठ परंपरेला अनुसरून महाविद्यालयात ‘क्रांती सप्ताह’ अत्यंत उत्साहात व अभिमानाने आचरण्याचा दृढ निर्धार नुकताच करण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या …

Read More »

मराठा युवक संघातर्फे कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ २१ व्या भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : मराठा युवक संघ, आबा व हिंद स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ २१ व्या भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन शनिवार, २९ ऑगस्ट आणि रविवार, ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडणार असून, याबाबतचा निर्णय मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी अक्षता …

Read More »

कर्नाटक विधान परिषदेच्या सभापती पदी गायत्री शांतेगौडा

  बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांनी विधान परिषदेच्या सभापती पदी शुक्रवारी विधान परिषदेचे माजी सभापती बसवराज होरट्टी यांच्या दालनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. तसेच केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, मंत्री नरेंद्रस्वामी, विधान परिषदेचे सरकारी …

Read More »

प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : आबासाहेब दळवी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढते स्थलांतर, बदलती सामाजिक परिस्थिती आणि इतर विविध कारणांमुळे सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन …

Read More »

शिक्षणमहर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    बेळगाव : माजी आमदार तथा शिक्षणमहर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा वाढदिवस शुक्रवारी (७ ऑगस्ट) सिद्धार्थ बोर्डिंग, शहापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या …

Read More »

मास्टर वेदांत आनंद मिसाळे याचे सी.बी.एस्.ई. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावचा विद्यार्थी मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने सी.बी.एस.ई. साऊथ झोन–II जलतरण स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही स्पर्धा दि. २७ ते २९ जुलै …

Read More »

सीमाभागातील शैक्षणिक समस्याबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री मुश्रीफ यांची भेट

  निपाणी (वार्ता) : सीमावादामुळे कर्नाटक भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना स्वतःच्या मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल येथे …

Read More »

‘व्हीबीजी रामजी’ योजनेत हलगर्जीपणा केल्यास पीडीओंचे निलंबन : मंत्री खांड्रे

  बंगळूर : १ जुलैपासून मनरेगा ऐवजी लागू करण्यात आलेल्या ‘व्हीबीजी रामजी’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून न देता तसेच मानवदिवस निर्मितीत निष्काळजीपणा करणाऱ्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांवर (पीडीओ) कठोर कारवाई करण्याचे निर्देश ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले आहेत. विकाससौध येथे गुरुवारी विभागाच्या वरिष्ठ …

Read More »

कर्नाटक सरकारचा कडक निर्णय : ग्रामपंचायत हद्दीत फक्त मातीच्या गणेशमूर्तींनाच परवानगी

  बंगळूर : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना व विसर्जनासाठी पर्यावरणपूरक, रंग न लावलेल्या मातीच्या गणेशमूर्तींनाच परवानगी देण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ईश्वर खांड्रे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होणार …

Read More »