संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न बेळगाव : श्रीभक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासाच्या जोरावर आपली घौडदौड सतत चालू ठेवली आहे.सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेने नवी गोल्ड लोन सेवा सुरू केली आहे, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी आज रविवारी पार पडलेल्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत …
Read More »गोकाकजवळ बस-दुचाकीची भीषण धडक; चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू
गोकाक : गोकाक तालुक्यातील कोन्नूरजवळ गुरुवारी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (NWKRTC) बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मूल गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिडकलहून गोकाककडे येणाऱ्या बसची गोकाक फॉल्स येथील पॉर्बस शाळेतून …
Read More »आंदोलनांनी वेठीस धरला चन्नम्मा चौक!
‘नो प्रोटेस्ट झोन’ घोषित करण्याची नागरिकांची संतप्त मागणी बेळगाव : शहराच्या वाहतुकीची जीवनवाहिनी मानला जाणारा कित्तूर राणी चन्नम्मा चौक आता आंदोलनकर्त्यांचा कायमस्वरूपी अड्डाच बनला आहे. कोणत्याही मागणीसाठी मोर्चा असो, रास्ता रोको असो किंवा निदर्शने असोत, प्रत्येक आंदोलनाची सुरुवात याच चौकातून होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडत आहे. …
Read More »बेळगावात जीवन विद्या मिशनच्या वतीने श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत रविवारी गुरु पौर्णिमेचे आयोजन
बेळगाव : श्री सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत रेल्वे ओव्हर ब्रीज जवळील मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सद्गुरूंचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै जातीने उपस्थित राहून प्रबोधन …
Read More »श्रावणाच्या तोंडावर उपवासाच्या पदार्थांचे दर वधारले
शेंगातेल २००, भगरीचा दर २०० रुपयांवर; श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लगबग निपाणी (वार्ता) : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येथील बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांच्या बाजारात महागाईची चाहूल लागली आहे. शेंगातेलाचा दर प्रतिकिलो २०० रुपयांवर, तर भगरीचा दर २१० रुपयांवर पोहोचला आहे. चनाडाळ, शेंगदाणे, साखर आणि गुळाच्या दरातही वाढ …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व हॅपीहार्ट फाउंडेशनतर्फे कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत “ॲनिमिया मुक्त बेळगाव” शिबिर यशस्वी
बेळगाव : समाजाच्या आरोग्यविषयक सेवेसाठी राबविण्यात येत असलेल्या “ॲनिमिया मुक्त बेळगाव” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व हॅपीहार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळा, बेळगाव येथे ॲनिमिया तपासणी व जनजागृती शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये एकूण ५१६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ॲनिमियाचे …
Read More »प्रेमचंद हे जनसामान्यांचे लोकप्रिय साहित्यकार; डॉ. रुपा च्यारी
बेळगाव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज कला व वाणिज्य पदवी तसेच पदवीपूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी साहित्यातील महान कथाकार व कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून देळे (काणकोण-गोवा) येथील श्री. मल्लिकार्जुन व श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी मास्टर रिधान राजेंद्र पाटील आणि मास्टर शौर्य खन्नुकर यांनी कर्नाटक राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा – २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत मास्टर रिधान राजेंद्र पाटील तसेच मास्टर शौर्य खन्नुकर …
Read More »बेळगावच्या युवकांनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रोडवर फडकविला तिरंगा
बेळगाव : बेळगावच्या साहसी युवकांच्या चमूने जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमलिंगला (Umling La) येथे यशस्वीरीत्या पोहोचून भारतीय तिरंगा फडकवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 19,024 फूट उंचीवर पोहोचत त्यांनी देशभक्ती आणि साहसाचा अनोखा संगम अनुभवला. या दुर्गम आणि अत्यंत उंच ठिकाणी तिरंगा फडकविण्याचा क्षण …
Read More »अखेर बिबट्या जेरबंद!
सुतकटीच्या जंगलातील आठ दिवसांची दहशत संपली; वन विभागाच्या सापळ्यात अडकला नरभक्षकाच्या धर्तीचा बिबट्या बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वंटमुरी घाटामागील सुतकटी (सुतगट्टी) गावाच्या वनक्षेत्रात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ग्रामस्थांची झोप उडविणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात जेरबंद झाला. बुधवारी पहाटे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतल्याने सुतकटी, शिवापूर आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta