निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीराम सेना कर्नाटक तर्फे ‘आपली दीपावली, आपला सण’ हा उपक्रम राबवून संस्कृती, देव, देश, धर्म, कर्तव्य म्हणून समाजातील अनाथ आणि सर्वसामान्य कुटुंबिया समवेत यंदाची दिवाळी साजरी केली. शिवाय त्यांना दिवाळीचा फराळ ही भेट देऊन त्यांच्या जीवनात एक दिवस तरी प्रकाश देण्याचा प्रयत्न केला. शहरा …
Read More »कार्तिक दीपोत्सवानिमित्त ममदापूरमधील प्रति तुळजाभवानी अंबाबाई मंदिर उजळले
निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.)येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी अंबाबाई मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी लावलेल्या दिव्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. श्रीकांत पुजारी व प्रमोद पुजारी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे देसाई- …
Read More »जत्राट भाग्यलक्ष्मी फायनान्सतर्फे दिवाळीनिमित्त भेटवस्तुंचे वितरण
निपाणी (वार्ता) : जत्राट (ता.निपाणी) येथील भाग्यलक्ष्मी फायनान्स कार्पोरेशन तर्फे दिवाळीनिमित्त संस्थेच्या खतेदारांना भेटवस्तुंचे वितरण करण्यात अले. यवेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार उपस्थित होते. सेक्रेटरी अमित चौगुले यांनी प्रास्ताविक केले.संस्थेचे संस्थापक सचिन कोले यांना श्रध्दांजली वाहिली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रथमापूजन झाल्यानंतर राजू पवार यांच्या …
Read More »क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याचे लवकरच अनावरण
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे ; सर्कलच्या सुशोभीकरणासाठी ३.२५ कोटीचा निधी निपाणी (वार्ता) : निपाणी -कोट्टलगी राज्यमार्गावर असलेल्या निपाणी येथील न्यायालयाजवळ क्रांतिवीर संगोळी रायन्ना सर्कल आहे. त्याच्या सुशोभीकरणासह चबूतर्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ३.२५ कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंजूर केला आहे. लवकरच या १५ फुट पुतळ्याचे अनावरण …
Read More »श्री विरूपाक्षलिंग समाधीमठ गो-शाळेला ५ टन ऊस अर्पण
विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षण सेवा समितीकडून संकलन गोरक्षण आणि गोसवर्धन करणे ही काळाची गरज-सुरेश भानसे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष विश्व हिंदू परिषद कडून समाधीमठ गोशाळाला पूजेच्या ५ टन ऊस अर्पण निपाणीतील व्यापाऱ्यांना गोरक्षण सेवा समिती कडून केलेल्या आव्हानाला व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रतिसाद मिळाला. शहरामधील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक दिवाळीनिमित्त …
Read More »तीन पिढ्यांतील सदस्यांनी अनुभवली एकत्रित दिवाळी
बेनाडीतील तंगडे कुटुंबीयांची दिवाळी ; कुटुंबात आहेत ३२ सदस्य निपाणी (वार्ता) : शहरातील गगनचुंबी इमारतींमध्ये आणि कृत्रिम रोषणाईत हरवलेला सणाचा खरा आनंद अजूनही गावात सापडतो. नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण व इतर कामानिमित्त अनेक जण शहरात वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा गावाकडे येऊन सणाला हजेरी लावून जाणाऱ्या कुटुंबांची संख्या आहे. पण …
Read More »निपाणी परिसरात सोमवारी झाली ओवाळणी; आज अभ्यंगस्नान
निपाणी (वार्ता) : दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. काही कुटुंबीयांनी सोमवारी ओवाळणीचा कार्यक्रम आटोपला. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी झाली. त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी अनेक कुटुंबीयांनी आपला भाऊरायाला ओवाळणी केली. मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य …
Read More »निपाणी दर्गाहमध्ये दिवाळीचा पहिला अभिषेक
दिवाळी सणाचा उत्साह : मानकरी, उरूस कमिटीची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या यांच्या दिवाळी सणाला सोमवारी (ता. २०) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. त्यानुसार उरूस उत्सव कमिटी व मानकरी यांच्या उपस्थितीतधार्मिक विधींना सुरुवात झाली. दर्गाह मधील …
Read More »साहित्यिक महादेव मोरेंचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन
लेखिका सुचिता घोरपडे; दिवंगत महादेव मोरेंच्या ‘भरारी’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांनी अस्सल ग्रामीण भागात कथा, प्रवास वर्णन, सर्वसामान्यांची दुःखे शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण साहित्यात मोठी भर पडली आहे. त्याची कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे. त्यामुळे निपाणी शहराचे नाव …
Read More »देशाच्या प्रगतीत शंकरानंदांचे योगदान महत्वपूर्ण
सूर्यकांत पाटील- बुदिहाळकर; बी. शंकरानंद यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : सध्या नेते मंडळी खुर्ची टिकवण्याचाच प्रयत्न करत आहेत. अशा आव्हानातून नागरिकांना पुढे जायचे आहे. ‘सत्तेसाठी मी आणि माझ्यासाठी सत्ता’ असे राजकारण सुरू आहे. मात्र बी. शंकरानंद यांनी आपल्या सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta