बेंगळूर (वार्ता) : राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले. बेंगळूरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, कोरोना संसर्गाचा दर वाढण्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. तो वाढेलही. राज्यात लसीकरण यशस्वी झाले असल्याने संसर्गाची तीव्रता वाढणार नाही. लॉकडाऊनचा तर सरकारने …
Read More »आमदार डॉ. अंजली निंबाळकरांच्या वक्तव्याचा खानापूर म. ए. समितीकडून जाहीर निषेध
खानापूर (वार्ता) : परप्रांतातून येऊन खानापुरात आमदारकी मिळवणार्या आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी इथल्या मूळ निवासी जनतेला शिकवू नये, निवडणुकीपूर्वी मराठी मते मिळवण्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृतीचा आग्रह धरणार्या निंबाळकरांनी कन्नड धार्जिण्या नेत्यांना खूष करण्यासाठी मराठी जनतेच्या विरोधात गरळ ओकून खायचे दात दाखवले आहेत, भविष्यात तालुक्यातील मराठी भाषक जनता त्यांना नक्कीच …
Read More »हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री : डॉ. डी. एच. हुगार
संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. आतापर्यंत 6 हजार लोक बाधीत झाले आहेत. हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री झाली असून तीन जणांना ओमीक्रॉनची बाधा झाली आहे. यामध्ये आरोग्य विभागातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी सांगितले. ते अंमणगी येथील …
Read More »बोरगाव नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगरपंचायत कार्यालयात प्रवेश
उत्तम पाटील यांची उपस्थिती : शहराच्या विकासासाठी कार्य करणार निपाणी (वार्ता) : नुकत्याच पार पडलेल्या बोरगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विजयी नगर विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शुभमुहूर्तावर नगरपंचायत कार्यालयात प्रथमताच प्रवेश करण्यात आला. दरम्यान प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांचा प्रवेश प्रित्यार्थ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थित …
Read More »अंमणगी श्री मल्लिकार्जुन यात्रेला निर्बंध; धार्मिक कार्यक्रमांना अनुमती
संकेश्वर (वार्ता) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंमणगी श्री मल्लिकार्जुन यात्रा शासनाच्या मार्गसूचीनुसार धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सभेला हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी मार्गदर्शन केले. कर्नाटकात ओमीक्रॉनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने यात्रोत्सवाला परवानगी देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यात्रा …
Read More »संविधानाच्या चौकटीत राहून लिखाण करण्याची गरज
डॉ. अलोक जत्राटकर : निपाणीत पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : सीमाभागातील जनतेचा आवाज म्हणून निपाणी भागातील पत्रकारांनी ध्येयवादी काम केले आहे. मात्र अलिकडच्या काळात जगणे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती येत आहे. अशा परिस्थितीत आपल्यासह कुटुंबाची पर्वा न करता पत्रकारांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. सध्याची पत्रकारिता भांडवलधारीवर अवलंबून राहिली जात …
Read More »विधान परिषद सदस्यांचा शपथविधी; चन्नराज हट्टीहोळी यांनी घेतली शपथ
बेळगाव (वार्ता) : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा आज बेंगळुरात पार पडला. यावेळी बेळगावचे एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. नव्याने निवडून आलेल्या विधान परिषद सदस्यांचा शपथविधी गुरुवारी बेंगळुरातील विधानसौधमधील बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. यावेळी सभापती बसवराज होरट्टी यांनी नव्या …
Read More »आम. अंजलीताई निंबाळकर यांचे समितीबद्दल वादग्रस्त वक्तव्य
सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! खानापूर (वार्ता) : खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकरांनी आज खानापूर तालुक्यातील इटगी गावातील एका योजनेच्या शुभारंभप्रसंगी एक वादग्रस्त भाषण केले असून हे भाषण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहे. सदर व्हिडिओमध्ये आमदार अंजली निंबाळकरांनी राजद्रोहासंदर्भात उल्लेख केला असून राजद्रोहाची नेमकी व्याख्या हि कुणासाठी आहे? असा सवाल …
Read More »संपूर्ण लॉकडाऊन होऊ नये यासाठीच, विकेंड लॉकडाऊन : मंत्री अश्वथ नारायण यांची माहिती
बेळगाव : राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने १५ दिवसांच्या कालावधीत वीकेंड कर्फ्यूसह अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण लॉकडाऊन रोखणे हा त्यामागचा हेतू आहे. अशी माहिती मंत्री अश्वथ नारायण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री अश्वथ नारायण पुढे …
Read More »पन्नास वर्षानंतर पुन्हा भरला ‘त्यांचा’ वर्ग
जांबोटी विद्यालयात सन 1971च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा खानापूर : शाळेची घंटा वाजली, प्रार्थना -राष्ट्रगीत झाले. फक्कड पांढरे झालेले केस तर कुणाचे टक्कल पडून विमानतळ झालेले, नजर अंधुक झाल्याने बहुतेकांच्या डोळ्यावर चष्मा, तर कुणी तब्येतीला जपत मंद चालीने वर्गात प्रवेश करत. असे वयाच्या पासष्ट सत्तरीकडे झुकलेले विद्यार्थी वर्गात बसले. वयाची पंचाण्णव पार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta