सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शुक्रवारी (24 मे) 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. तत्कालीन केवायआयसी चेअरमन व्हीके सक्सेना (आता दिल्लीचे नायब राज्यपाल) यांनी पाटकरांविरोधात याचिका दाखल केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, साकेत न्यायालयाचे …
Read More »२२ जणांची हत्या करणारा किस्सू तिवारी रामलल्लाच्या दर्शनाला; पोलिसांनी केली अटक
मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली आहे. किस्सू तिवारी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५५ हजारांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. किस्सू तिवारीला अटक करण्यात आली …
Read More »बांगलादेशातील बेपत्ता खासदाराचा कोलकात्यात सापडला मृतदेह; हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
कोलकाता : बांगलादेशातील एक खासदार भारतात उपचार घेण्यासाठी आले होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारी (ता. २२ मे) कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खासदार अन्वारुल अझीम …
Read More »खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार
पणजी : राज्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसावेळी भरसमुद्रात २४ पर्यटक असलेली बोट अडकली. बोटीवर पर्यटकांसह दोन कर्मचारी असा २६ जणांचा गट होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांचे जीव वाचवले. मुरगाव बंदरनजीक दोनतास हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालले होते. पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या …
Read More »पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ५९.०६ टक्के मतदान झाले. या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील तुरळक हिंसाचार आणि ओदिशातील मतदान यंत्रातील कथित बिघाड-गोंधळ वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. महाराष्ट्रात सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक ७३.१४ …
Read More »गुजरात एटीएसची मोठी कारवाई, आयएसआयएसच्या ४ दहशतवाद्यांना अटक
अहमदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी 2023 मध्ये एटीएसने राजकोटमधून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ते तिन्ही दहशतवादी बांगलादेशी हँडलकरसाठी काम करत होते. दहशतवादी संघटनेसाठी लोकांची भरती …
Read More »इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजानमधून परतत होते. त्याचवेळी त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. १७ तास उलटल्यानंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलं आहे. हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. या अपघातात रईसी यांच्यासह कुणीही वाचलेलंं नाही.. रेड क्रिसेंटने याबाबतची माहिती दिलेली नाही. एक ड्रोन …
Read More »रामदेव बाबांना पुन्हा धक्का, पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यामुळे पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण अडचणीत आले आहेत. दरम्यान, या कंपनीसमोरील अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर आता पतंजलीसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. पतंजली कंपनीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी पतंजली …
Read More »सिंगापूरमध्ये आढळले कोरोनाचे 25 हजार रूग्ण
सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. 5 ते 11 मे दरम्यान देशात 25,900 हून अधिक कोरोनाचे नवीन रूग्ण आढळले आहेत. सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी शनिवारी (दि.18) देशवासीयांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला. ते म्हणाला, ‘आपण कोरोनाच्या नव्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. त्यात सातत्याने वाढ …
Read More »पाक समर्थक हेरगिरी प्रकरण; एनआयएने फरार मुख्य आरोपीला केली अटक
बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हैदराबाद हेरगिरी प्रकरणी घोषित गुन्हेगार नूरुद्दीन उर्फ रफी याला अटक केली आहे. नुरुद्दीन जामिनावर बाहेर आला असून तो अनेक दिवस बेपत्ता होता. त्याला म्हैसूरच्या राजीव नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. नुरुद्दीनवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी एनआयए अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta