Friday , November 6 2026
Breaking News

Uncategorized

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व दूरदर्शी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर, उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर व शिक्षक …

Read More »

बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कबाबत हुबळीचे हेस्कॉमचे अध्यक्ष अजमपीर खाद्री यांना राजेंद्र वड्डर- पवार यांचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क गेल्या पाच वर्षापासून बंद स्थितीत आहे. याबाबत अनेकवेळा येथील कारखानदारांनी कर्नाटक सरकार व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा केली. पण याला कोणत्याही प्रकारची यश आले नाही. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार त्यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. त्यामुळे बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क सुरू …

Read More »

वारसांना सर्व मालमत्ता देण्यापूर्वी विचार करा : ऍड. मारूती कामाण्णाचे यांचा सल्ला

  बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना कायद्याने कवच कुंडल प्रदान केली असून ती समजून घेण्याची गरज असल्याचे मत ऍड. मारूती कामाण्णाचे यांनी व्यक्त केले. बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्याचे कवच कुंडल’ या विषयावर बोलत होते. …

Read More »

येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष द्यावे; येळ्ळूर ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, येळ्ळूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन सादर केले. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे अनेक नागरिकांनी ई-सत्तु (संगणक उतारे) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र अद्याप कोणालाही उतारे मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्ज प्रकरण, मालमत्ता हस्तांतरण …

Read More »

दिनेश ओऊळकर यांचा लवकरच नागरी सत्कार

  बेळगाव : बेळगावचे सुपुत्र व महाराष्ट्र सहकार खात्याचे माजी अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर यांची नुकतीच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) सहकारी बॅंकासाठी आदर्श उपविधी तयार करण्यात येणाऱ्या समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा लवकरच नागरी सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटील होते. त्यानी …

Read More »

अथणीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात गुरुवारी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ करून खून केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. संगीता गाडीवड्डर असे मृत महिलेचे नाव आहे. संगीताचा विवाह व्यंकटेश गाडीवड्डर याच्याशी झाला होता. गेल्या काही वर्षांपासून पती आणि सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी तिचा …

Read More »

बेळगावमध्ये घरात डांबून ठेवलेल्या महिला आणि मुलांची ‘अक्का पथका’कडून सुटका

  बेळगाव : पतीकडून घरात डांबून ठेवलेल्या आणि शारीरिक तसेच मानसिक छळाला सामोरे जाणाऱ्या एका महिलेची व तिच्या दोन मुलांची बेळगाव पोलिसांच्या ‘अक्का पथका’ने यशस्वी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पीडितेची सुरक्षित रवानगी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईची …

Read More »

मोदी सरकारला पहिला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर

  नवी दिल्ली : अखेर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं आहे. हे विधेयक नामंजूर झालं आहे. बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. मात्र तेवढे मतं विधेयकाच्या बाजुने पडले नाहीत. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजुने 298 मतदान झालं. तर या विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान

  बेळगाव : युवा समिती सीमाभाग च्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. चळवळीतून मोठा झालेला एक प्रामाणिक कार्यकर्ता आज मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर बेळगावातील मराठी माणसांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. बेळगावातल्या अनेक संस्था यशस्वीपणे चालवण्या बरोबरच सीमा लढ्याचे न्यायालयीन …

Read More »

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली दीपक दळवी साहेबांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

  येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व आणि सीमा लढ्यातील झुंजार व्यक्तिमत्व दीपक दळवी साहेब यांच्या निधनामुळे सीमाभागावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगात दळवी कुटुंबाला आधार देण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेण्यात आली. या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत दीपक दळवी …

Read More »